बातम्या
शाश्वत विकास ध्येयामध्ये पर्यावरणीय संरक्षणाला अनन्य साधारण महत्त्व अनुजा बाली कार्तिकेयन
By nisha patil - 1/23/2024 4:42:29 PM
Share This News:
किर्लोस्कर इकोरेंजर्स, दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग व लक्ष्मी फाउंडेशन गर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल वर्कशॉप ऑन युथ अलायन्स फाॅर एन्व्हायरमेंट सस्टनेबिलिटी या विषयावर बोलताना पर्यावरणीय चळवळीतील कार्यकर्त्या श्रीमती अनुजा बाली कार्तिकेयन यांनी वरील उद्गार काढले. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात पर्यावरणीय संरक्षण आव्हानात्मक होत चालले असून या विषयाची वारंवार जागतिक पातळीवरील चर्चा घेत असली तरी स्थानिक पातळीवर याबाबत कृतिशील उपक्रम राबवले जाणार नाहीत तोपर्यंत या कामी यश मिळणे अवघड असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यशाळेच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाडाचे रोप लावून उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक किर्लोस्कर कंपनीचे सी. एस. आर. व्यवस्थापक शरद अजगेकर यांनी केले. पाहुण्यांचे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दीपक भोसले यांनी या कार्यशाळेमधून विद्यार्थ्यांना कृतिशील उपक्रमांची माहिती होऊन पर्यायने पर्यावरण रक्षणाला हातभार लागेल असा आशावाद व्यक्त केला. त्याचप्रमाणे टीव्हीची शर्मा यांनी सायबर च्या कार्याविषयी येताना उपस्थितांना माहिती दिली. तर किर्लोस्कर कंपनीचे मनुष्यबळ विकास प्रमुख श्री धीरज जाधव यांनी भास्कर कंपनी नेहमीच पर्यावरण रक्षणाच्या व संवर्धनाच्या उपक्रमांसाठी सदैव तत्पर असून ही कार्यशाळा देखील त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात कुडाळ येथील भगीरथ प्रतिष्ठान चे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत असले विविध पर्यावरणीय उपक्रमांची माहिती काही प्रात्यक्षिक उदाहरणा सहित कार्यशाळेत विषद केली. तर तिसऱ्या सत्रात इचलकरंजी येथील पर्यावरणीय चळवळीचे कार्यकर्ते श्री संदीप चोढणकर यांनी जलसाक्षरता जलसाक्षरतेचे महत्व उपस्थित त्यांना पटवून सांगितले. तर
पंचगंगा अमृत वाहिनी संकल्प विषयीचा कृतिशील आराखडा उपस्थितांसमोर सादर केला. तर कार्यशाळेचा समारोप सत्रात बायफ संस्थेचे व स्कोप या धारवाड स्थित संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश भाट यांनी जग जगभरात पर्यावरणाची न भरून येणारे नुकसान झालेले असून आपण जेवढ्या लवकर याबाबत सकारात्मक पावले उचलून त्या पटीत धोक्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यशाळेच्या शेवटी विविध महाविद्यालयातील सुमारे २०० विद्यार्थी विद्यार्थीनींनी भविष्यकालीन उपाययोजनांची नियोजन पूर्व आखणी केली. कार्यशाळेचे आभार प्रदर्शन श्री विनायक देसाई यांनी केले. तर कार्यशाळेचा गोशवारा डॉ. सुरेश आपटे यांनी केला. कार्यशाळेस सायबर चे विश्वस्त व व्यवस्थापकीय सचिव सी ए डॉ. रणजीत शिंदे व सी ए श्री. ऋषिकेश शिंदे, संचालक डॉ. एस पी रथ व प्रशासकीय अधिकारी डॉ. विनायक साळुंखे यांचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर डॉ. सोनिया रजपूत, डॉ. कालिंदी रानभरे, प्रा. पूनम माने, प्रा. महेंद्र जनवाडे, प्रा. शर्वरी काटकर व विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाश्वत विकास ध्येयामध्ये पर्यावरणीय संरक्षणाला अनन्य साधारण महत्त्व अनुजा बाली कार्तिकेयन
|