बातम्या
शहाजी महाविद्यालयात वृक्षांना राख्या बांधून पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरे.
By nisha patil - 8/30/2023 6:01:23 PM
Share This News:
कोल्हापूर: श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आज बुधवारी महाविद्यालय परिसरातील वृक्षांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने पर्यावरण पूरक रक्षाबंधन विद्यार्थ्यांनी साजरे केले. बांधलेल्या या राख्या सुद्धा विविध वृक्षांच्या बियापासून तयार करण्यात आले होत्या. यामुळे वृक्ष संवर्धन आणि जैवविविधता संवर्धन साधण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी समाजाला दिला. या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. ए. व्ही.मगदूम पाटील, प्रबंधक मनीष भोसले यांचे या उपक्रमास मार्गदर्शन लाभले. या नावीन्यपूर्ण उपक्रमास संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा व मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचेही प्रोत्साहन मिळाले. प्रा. सौ. कविता कुंभार,प्रा.कु.श्रद्धा महाले, प्रा. सौ. पी. ए. पाटील तसेच विद्यार्थिनी सूर्यजा हंडे,ऋतुजा देसाई, सानिका पाटील व इतर 45 हूनअधिक विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
या उपक्रमाबाबत बोलताना प्राचार्य डॉ. आर. के.शानेदिवाण म्हणाले, निसर्गाला भाऊ मानल्याने तो आपल संरक्षण करेल . निसर्ग व नवीन तरुण पिढी यांचे अतूट बंद निर्माण होण्यास यामुळे मदत होणार आहे.
प्रा. सौ. ए. व्ही. मगदूम पाटील म्हणाल्या की या राख्या वेगवेगळ्या बियांपासून बनवलेल्या असून त्या वृक्षांना बांधण्यात आलेले आहेत. ज्यावेळी त्या जमिनीवर पडतील त्यावेळी दुसरी नवीन रोपे तयार होऊन जैवविविधतेस मदत होणार आहे. यामध्ये विद्यार्थी प्राध्यापक आणि समाजाला जैव विविधता आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश मिळणार आहे . प्लास्टिक व इतर कचऱ्यापासून देखील मुक्ती मिळणार आहे. स्वागत प्रा. सौ.पी.ए.पाटील यांनी केले. आभार वैभवी घाग यांनी मानले
शहाजी महाविद्यालयात वृक्षांना राख्या बांधून पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरे.
|