बातम्या

संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने निबंध स्पर्धा उत्साहात

Essay competition on behalf of Sanskriti Pratishthan in spirit


By nisha patil - 8/21/2023 4:40:29 PM
Share This News:



संस्कृती प्रतिष्ठान, इचलकरंजी या संस्थेच्या दुस-या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यावर्षी वर्धापन दिनानिमित्त ( गट इयत्ता 7 वी ते 10 वी ) आंतरशालेय निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.

 संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पर्यावरण, सामाजिक, साहित्यिक उपक्रम घेतले जातात. वृक्षारोपण, विविध बौद्धिक स्पर्धा, साहित्यिकांशी संवाद साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते . नामवंत, प्रतिष्ठित साहित्यिकांच्या हस्ते एका साहित्यकृतीला पुरस्कार दिला जातो. यामध्ये सन 2021चा यावर्षीचा संस्कृती काव्य पुरस्कार अंजली ढमाळ (पुणे) यांच्या ज्याचा त्याचा चांदवा' या काव्यसंग्रहाला देण्यात आला. सन 2022 चा संस्कृती कादंबरी (बीड) पुरस्कार विजय जावळे यांच्या 'लेकमात' या कांदबरीला देण्यात आला . साहित्यकृतीचा विचार करून अत्यंत पारदर्शकपणे हे काम केले जाते. समाजाच्या हिताचे काम करणारी ही संस्था अनेक संस्थांशी जोडली गेली आहे. त्यामुळे विविध उपक्रम राबविण्यामध्ये संस्कृती प्रतिष्ठान अग्रेसर आहे . निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे कु . हर्षद शिवाजी वांजोळे प्रथम क्रमांक, कु. मैथिली बजरंग ढगे द्वितीय क्रमांक, वरदा राजेंद्र कांबळे- तृतीय क्रमांक , वैष्णवी सूर्यकांत कोट्टलगी- उत्तेजनार्थ, समृद्धी गांजवे- उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला.

इचलकरंजी हायस्कूल इचलकरंजीचे यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे- कु. संस्कृती सचिन टारे - प्रथम क्रमांक, कु. श्रीया सुरेश सुतार- द्वितीय क्रमांक, कु. अपेक्षा अमोल थोरवत तृतीय क्रमांक कु. दर्शनी प्रशांत चाळके -उत्तेजनार्थ, कु. अदिती सुदर्शन हुल्ले उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला. या विद्यार्थ्यांना बक्षीस रूपात ग्रंथभेट देण्यात आले.या स्पर्धचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे , सदस्य संजय रेंदाळकर यांनी केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष पंडित कांबळे , सचिव अनुराधा काळे व सदस्य सुनील कोकणी यांचे मार्गदर्शन लाभले. सल्लागार अजय कांडर व मधुकर मातोंडकर यांचे प्रोत्साहन लाभले.


संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने निबंध स्पर्धा उत्साहात