शैक्षणिक

र्बोर्डाच्या दहावी ब बारावी परीक्षेसाठी ७० भरारी पथके स्थापन

Establishment of 70 Bharari squads for 10th and 12th board exams


By nisha patil - 6/2/2025 7:22:57 PM
Share This News:



  दहावी व बारावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील कॉपीविरोधी ७० भरारी पथके स्थापन करण्यात आलीय. परीक्षा केंद्राच्या पन्नास मिटर अंतरावरील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परीक्षा केंद्राच्या ५०० मिटर परिसरात जमाव बंदी आदेश जारी करण्यात आलाय. बारावीची परीक्षा ११ तारखेपासुन तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 

बारावीची ७३ तर दहावीची परीक्षा १३८ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आलय. परीक्षेच्या अगोदर दीड तास हे बैठे पथक केंद्रावर उपस्थित राहून वर्ग खोल्या व परीक्षार्थीची तपासणी करेल. यातूनही एखादा विद्यार्थी कॉपी करताना सापडला तर केंद्र संचालक व बैठे पथकातील कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी सांगितले.


र्बोर्डाच्या दहावी ब बारावी परीक्षेसाठी ७० भरारी पथके स्थापन
Total Views: 46