बातम्या
महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
By nisha patil - 5/10/2024 6:11:00 AM
Share This News:
महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
राजेश क्षीरसागर आणि ललित गांधी यांचा यशस्वी पाठपुरावा
कोल्हापूर दि.०४ : जैन समाजाच्या संपूर्ण भारतातील एकूण संख्येपैकी सर्वाधिक म्हणजे ६० लाख इतक्या संख्येने जैन समाज महाराष्ट्रामध्ये राहात असुन, जैन समाजाची देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य 'महाराष्ट्र राज्य' आहे. महाराष्ट्रासह देशात सर्वाधिक सामाजिक संस्था चालविण्याची ख्याति असलेला जैन समाज व्यापार-उद्योगामध्येही अग्रेसर असुन सर्वाधिक कर देणारा समाज आहे. मात्र याच समाजात शेतीमध्ये काम करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असुन निम्न मध्यमवर्ग व दारीद्रय रेषेखालील लोकांची संख्या ३० टक्के इतकी आहे. समाजातील या घटाकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावे अशी गेली अनेक वर्षांची मागणी होती. याबाबत अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे निवेदन सादर केले होते. राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याची विनंती केली. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर आणि अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या पाठपुराव्यास यश मिळाले.
याबाबत प्रतिक्रिया देताना राजेश क्षीरसागर यांनी, हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या जैन धर्मातील महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे व धार्मिक क्षेत्रांचा विकास व संरक्षण, जैन साधु-साध्वी यांची सुरक्षा, जैन धर्म- संस्कृति-साहीत्य यांचे संवर्धन व सुरक्षा, जैन युवकांना उद्यमशीलतेसाठी आर्थिक सहाय्य, जैन विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम या प्रमुख उद्दीष्टांच्या पुर्ततेसाठी जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन्याची आवश्यकता होती. जैन समाजाच्या सभेमध्ये जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्यातील जैन समाजाच्या उन्नतीचे द्वार खुले झाले असून, निश्चितच याचा लाभ जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे.
दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पुन्हा एकदा सिद्ध : राजेश क्षीरसागर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुती सरकारने लोकोपयोगी निर्णयांचा धडाका लावला आहे. हे सरकार जनसामान्यांचे हित जपणारे सरकार आहे. लाडकी बहीण, मोफत शिक्षण अशा अनेक लोकोपयोगी निर्णयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने जनभावनांचा आदर ठेवून कार्यतत्परतेने निर्णय घेत आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देवून निधी देण्याची ग्वाही दिली होती. चार दिवसांपूर्वी रु.२५ कोटींचा निधी मंजूर करून दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती केली. असे अनेक जनहिताचे निर्णय घेवून सर्वसामान्यांना व सर्वच घटकांना न्याय देण्याऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानत असल्याचेही श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हंटले आहे.
महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
|