बातम्या

महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन महत्वाचे

Estrogen hormone is important


By nisha patil - 10/2/2024 7:58:49 AM
Share This News:




हार्मोन्स शरीरातील प्रमुख क्रिया नियमित करतात. त्यांचे जसे फायदे तसे तोटेही असतात. काही पुरूषांसाठी तर काही महिलांसाठी खास असतात. महिलांच्या आरोग्यासंबंधी अ‍ॅस्ट्रोजन हा हार्मोन खूप महत्वाचा आहे. स्त्रीत्वाशी संबंधित अनेक गोष्टी या हार्मोनने घडतात. तसेच अकाली वृद्धत्व, जास्त वयातही तरूण दिसणे यासाठीही हेदेखील याच हार्मोन्समुळे घडत असते.

अ‍ॅस्ट्रोजन होर्मोन्स हे जास्तीत जास्त गर्भाशयातून तयार होतात. त्यांचे प्रमाण कमी असेल तर शरीरातील अवयवांवर परिणाम होतो. ज्या महिलांना एनोरेक्सियासारखा इटिंग डिसऑर्डरचा (खाण्यासंबंधी विकार) त्रास असाते त्यांच्यात अ‍ॅस्ट्रोजनची कमतरता निर्माण होऊ शकते. अ‍ॅस्ट्रोजनच्या कमतरतेची वेगवेगळी कारणे असू शकतात. गर्भाशयाचे नुकसान झाले असेल तर शरीरात अ‍ॅस्ट्रोजनचे प्रमाण कमी होते. मेनोपॉजमुळेही अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन कमी होतात. मेनोपॉज येण्याच्या काही वर्षांआधीपासूनच अ‍ॅस्ट्रोजनचा स्तर कमी होऊ लागतो. याला प्री-मेनोपॉज म्हणतात.

प्री म्यॅच्युअर ओवेरिअन फेलिअर, थायरॉइड डिसऑर्डर, प्रमाणापेक्षा जास्त एक्सरसाइज करणे, सतत वजन कमी होत जाणे, कीमोथेरपी यामुळे अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन्सचे प्रमाण महिलांमध्ये कमी होते. नियमित मासिक पाळी होण्याचे मुख्य कारण अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन आहे. त्यामुळे अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यावर त्याचा सर्वात पहिला प्रभाव मासिक पाळीवर पडतो. अस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे ओव्यलेशनमध्ये अडचण येते. त्यामुळे गर्भधारणेत समस्या होऊ शकते. अ‍ॅस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे व्हजायनल लुब्रिकेशनवरही प्रभाव पडतो.


या हार्मोनच्या कमतरतेमुळे व्हजायनात कोरडेपणा येऊन शारीरिक संबंधावेळी महिलांना अधिक वेदना होतात. अ‍ॅस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे महिलांना मेनोपॉजदरम्यान अचानक घाम येणे आणि फार जास्त गरम होते. अ‍ॅस्ट्रोजनमुळे सेरोटोनिन नावाचे हार्मोन रिलीज होते, हा हार्मोन मूड चांगला ठेवतो. अ‍ॅस्ट्रोजन कमी झाल्यास सेरोटोनिन कमी रिलीज होऊ शकतात आणि त्यामुळे मडू स्वींगचा धोका होतो. अ‍ॅस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे मूत्रमार्गात असलेले टिश्यू पातळ राहतात. ते विकसित होऊ न शकल्याने यूटीआयचा धोका होऊ शकतो.


महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन महत्वाचे