बातम्या

शरद पवारांनाही नव्हते वर्ल्डकप फायनलचे निमंत्रण....

Even Sharad Pawar was not invited to the World Cup final


By nisha patil - 11/22/2023 4:51:54 PM
Share This News:



 'बीसीसीआय'चे आणि 'आयसीसी'चे माजी अध्यक्ष शरद पवार यांना नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचे निमंत्रण नव्हते, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. 

क्रिकेट वर्ल्डकपच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. यात भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला. या पराभवानंतरही देशवासीयांनी भारतीय संघाच्या वर्ल्ड कपातील एकूण कामगिरीबद्दल कौतुक केले बीसीसीआय'चे आणि 'आयसीसी'चे माजी अध्यक्ष शरद पवार यांना नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचे निमंत्रण नव्हते, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. 
    शरद पवारांनाही निमंत्रण नसल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी क्रिकेटसाठी अनेक वर्ष काम केले. देशात क्रिकेटशी संबंधित सर्वात मोठी संघटना असलेल्या 'बीसीसीआय'चे ते अध्यक्ष होते. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे, त्यामुळे त्यांना निमंत्रण दिले जाणे अपेक्षित होते. आता शरद पवारांना निमंत्रण नव्हते ही माहिती मिळाल्यानंतर यावरही नाराजी व्यक्त केली जात आहे.


शरद पवारांनाही नव्हते वर्ल्डकप फायनलचे निमंत्रण....