बातम्या

उद्धवजी सात जन्म झाले तरी फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत - चंद्रशेखर बावनकुळे

Even if Uddhavji takes seven births, he will not be able to match Fadnavis


By nisha patil - 1/13/2024 4:22:31 PM
Share This News:



उद्धवजी सात जन्म झाले तरी फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत - चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर  निशाणा

मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यावर टीकास्त्र सोडले. "उद्धवजी फोटोग्राफी करायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस  कारसेवक होते, सात जन्म झाले तरी फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केलाय. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. ज्यावेळी बाबरी पाडली होते, तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं? असा टोला ठाकरेंनी लागवला होता. त्याला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेय. 

फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत - 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की," उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस समजलेच नाहीत. माझा त्यांचा 35 वर्षांचा संबंध आहे. उद्धव ठाकरे फोटोग्राफी करायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस कारसेवक होते. सात जन्म जरी उद्धव ठाकरेंनी घेतले तरी फडणवीसांची बरोबरी करु शकत नाहीत"


अटलजींचा फोटो कुठे? ठाकरेंच्या आरोपाला उत्तर - 

उद्धव ठाकरे यांनी कालची (शुक्रवार) चित्रफीत नीट पाहिली नाही. अटल सेतूचं लोकार्पण करताना सर्वत्र बॅनरवर, जाहिरातीत अटलजींचा फोटो होता. मी नेहमीच म्हणतो उद्धव ठाकरे मिडियासमोर येऊन नॅरेटीव्ह सेट करतात. मोदी यांना जगातला सर्वोत्तम नेता असं जग म्हणतं. पण मोदी यांना महान म्हणायचं फक्त पाकिस्तान आणि उद्धव ठाकरेच राहीले आहेत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला.


उद्धवजी सात जन्म झाले तरी फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत - चंद्रशेखर बावनकुळे