बातम्या

पक्ष पळवला तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!...लडेंगे_और_जितेंगे! - आमदार रोहित पवार

Even if the party is run away


By nisha patil - 7/2/2024 11:29:10 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे मुंबई – निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यामूळं शरद पवार गटाला आता नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणारय. यावरून आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर ट्वीट केलंय. आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, लडेंगे और जितेंगे, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.

त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय कि, "केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते….

आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!
#लडेंगे_और_जितेंगे!"


पक्ष पळवला तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!...लडेंगे_और_जितेंगे! - आमदार रोहित पवार