बातम्या

जगातील सर्वात गोड फळ तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरतो फायदेशीर

Even the sweetest fruit in the world is beneficial for diabetic patients


By nisha patil - 1/13/2024 7:33:14 AM
Share This News:



गोड फळे खाण्यासाठी सगळ्यांनाच आवडतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, जगातील सर्वात गोड फळांच्या यादीत अंजीरचा देखील समावेश आहे. अंजीर हे गोड असले तरी ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

अंजीर खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. अंजीरमध्ये फायबर, तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, रिबोफ्लेविन, थायामिन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. अंजीरमध्ये अनेक महत्त्वाचे घटक आढळतात. गोड असूनदेखील ते मधुमेह दूर करण्यास मदत करतात. अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, म्हणजेच ते खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोज वेगाने वाढत नाही.

आपल्या शरीराला उर्जा हवी असेल तर आपल्याला ग्लुकोजची आवश्यकता असते. पण जेव्हा याचेच प्रणाण वाढू लागते. तेव्हा मधुमेहासारखे आजार होतात. त्यामुळे मधुमेहामध्ये रक्तातील ग्लुकोज कमी ठेवण्यासाठी अंजीर खावे. अंजीर हे पौष्टिक ड्रायफ्रूट आहे. अंजीरच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज काढून टाकण्याची क्षमता अंजीरमध्ये असते.

अंजीरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो

अंजीर हे फळ म्हणून खाल्ले तर त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. ताज्या अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 51 आणि वाळलेल्या अंजीरांचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 61 असतो. हे कमी ते मध्यम GI श्रेणीत येते. असे पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच ग्लुकोजची पातळी वाढत नाही.

पोटाच्या आजारांचा शत्रू

जर पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असतील तर अंजीर खालले पाहिजे. पोट व्यवस्थित साफ होत नसेल किंवा बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या असतील तर त्यांनी अंजीर खालले पाहिजे. अंजीरमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे साखरेचे चयापचय मंदावते. अंजीर खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढत नाही. यामुळे पचनशक्ती मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

अंजीर पाण्यात भिजवून खाण्याचे फायदे

अंजीर जर तुम्ही पाण्यात भिजवून खालले तर तुम्हाला याचा दुप्पट फायदा मिळू शकतो. भिजवलेले अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे अंजीर अतिशय मऊ बनते जे सहज पचवता येते. अंजीर खाल्ल्याने शरीराला भरपूर पोषण मिळते.


जगातील सर्वात गोड फळ तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरतो फायदेशीर