विशेष बातम्या

एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक

Evergreen actress Rekhas comeback on small screen


By nisha patil - 6/16/2023 7:34:09 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  गुम हैं किसी के प्यार में'  ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सर्वच वयोगटातील मंडळींना ही मालिका आवडते. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असून या मालिकेसंदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता या मालिकेत एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा  यांचं कमबॅक होणार आहे. 'गुम हैं किसी के प्यार में' या मालिकेतील नाट्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या लोकप्रिय मालिकेत बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांची एन्ट्री होणार आहे. रेखा यांच्या कमबॅकची बातमी ऐकताच त्यांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 
'गुम हैं किसी के प्यार में' मालिकेच्या आगामी भागात बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांची एन्ट्री होणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून रेखा स्टारप्लससोबत तिसऱ्यांदा काम करणार आहेत. अवघ्या विश्वाला आपल्या सौंदर्याने मोहित करणाऱ्या रेखा यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.


एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक