बातम्या

अकरावी व बारावीची प्रवेश यंत्रणा कोणाच्या हस्तक्षेपाशिवाय व विनाडोनेशन प्रत्येक कॉलजने राबवावी अन्यथा विध्यार्थी आंदोलन उभारू

Every college should implement 11th and 12th admission system without anyone's interference and without donation


By nisha patil - 3/7/2023 10:41:27 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्हा व शहर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अकरावी व वरिष्ठ वर्गामध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी सध्या विविध कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज करत असून पसंतीनुसार आपल्या हव्यात्या कॉलेजला पसंतीक्रम देत आहेत. तथापि काही संघटनांच्या लोकांच्या कडून किंवा काही विशिष्ट शैक्षणिक क्षेत्रातील संबंधित असणाऱ्या संघटनांच्या कडून कॉलेज प्रशासनावरती दबाव आणून आपल्याला हव्या त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मुजोरखोरीने करून घेण्याचे प्रमाण प्रमाणात वाढत असून गुणवान व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्यावर अन्यायकारक असून शैक्षणिक क्षेत्रातील या हस्तक्षेपाबद्दल तीव्र चिंताजनक आहे.. वस्तूताः कुठलाही प्रकारची अनामत न घेता वाढलेले शैक्षणिक खर्च पालकांना सुसह्य व्हावेत व विद्यार्थ्यांना सुलभ व अत्यंत शैक्षणिक उच्च दर्जाचे अध्यापन मिळावे यासाठी शासनाने सोडत प्रक्रिया अवलंबलेली आहे..
राज्य शासनाच्या या सोडत प्रक्रियेस अनसरून जिल्हा प्रशासनाने यासंबंधी योग्य ती कारवाई करणे गरजेचे असून सुद्धा अनेक कॉलेजमध्ये काही प्रवेश हे व्यक्तिगत पातळीवरती अथवा काही नेत्यांच्या व संघटनांच्या पार्श्वभूमीवरती होत आहेत असं जाणवुन आलेल आहे.. विद्यार्थ्यांनी आपापल्या पसंती क्रमानुसार दिलेले प्रवेश होत असतानाच त्यांना उपलब्ध कोट्यानुसार व त्या कॉलेजमध्ये राहिलेले प्रवेश इतरत्र विद्यार्थ्यांना *प्राधान्यक्रमानुसार द्यावे असा सर्वसाधारण नियम व संकेत असताना देखील कॉलेजच्या प्रशासनाकडून तो नियम पायदळी तोडून विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता डावलून त्यांना एखादं कॉलेज हवे असल्यास अनामत रक्कम घेऊन डोनेशनच्याद्वारे त्यांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न काही महाविद्यालयांच्या माध्यमातून चाललेला आहे असे आम्हाला कळते,हे निषेधार्थ आहे.
विद्यार्थी हा राष्ट्राचा उभारणीतला महत्त्वपूर्ण घटक असून कोल्हापुरात असणाऱ्या अनेक  दर्जेदार महाविद्यालयांमध्ये त्यांना शिक्षण मिळावे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते.. त्यानुसार केंद्रीय प्रवेश पातळीस अनुसरूनच विद्यार्थ्याला प्रवेश सुलभरीत्या मिळावा तसेच कुठलाही प्रकारचे अनामत व डोनेशन विद्यार्थ्यांच्या कडून घेतले जाऊ नये यासंबंधीचे स्पष्ट आदेश शिक्षण उपसंचालक यांच्याकडून सर्व महाविद्यालयांना निर्गमित व्हावेत..तसेच एखाद्या भरारी पथकांच्या वतीने कोल्हापूरातील कुठल्या कॉलेजमध्ये अनामत व  डोनेशन व ईतर निधी स्विकारून प्रवेश दिला जातोय का*? याची चाचणी शासनाने भरारी पथक नेमून त्यांच्या  माध्यमातून त्वरीत करावी..
व अशा पद्धतीचे डोनेशन देऊन प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांच्यावर मोठ्या प्रमाणात कडक कारवाई करावी अन्यथा शिवसेना युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )  पक्षातर्फे युवा सेनेच्या वतीने अशा सदरच्या कॉलेजच्या समोर ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं निव्वळ त्यांना एखाद्याच विशिष्ट कॉलेजला प्रवेश पाहिजे या प्रलोभनाला  विद्यार्थी बळी पडत आहेत त्या महाविद्यालय प्रशासनाविरोधा कॉलेजच्या समोर थाळीनाद आंदोलन करून सदरच्या कॉलेजच्या प्रशासनाच्या विरुद्ध आवाज उठवण्यात येईल ...शैक्षणिक वातावरणामध्ये कुठलाही प्रकारची गैरसमजुत व राजकीय हस्तक्षेप न व्हावा ही आमच्या संघटनेची व आमच्या नेत्यांची मानसिकता आहे ..तरी देखील विद्यार्थ्यांची लूट न होणे ही प्राथमिकता डोळ्यासमोर ठेवून शिक्षण उपसंचालक कार्यालयान सर्व  महाविद्यालयांच्या घटकांना या संबंधित सूचित करावे अन्यथा शिवसेनेतर्फे याची योग्य ती दखल घेतली जाईल....अश्या मागणीचे निवेदन आज युवासेनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक श्री चोथे यांना दिले.
यावर लगेचच उद्यापासून आम्ही भरारी पथक नेमून कोण दोषी आढळले तर कडक करावाइ करू व त्याचा रिपोर्ट आपणस देऊ असे आश्वासन दिले
याबरोबर असे कोण विध्यार्थी असतील कि ज्यांच्याकडून डोनेशन घेतले जात आहे, त्यांनी देखील आम्हांला संपर्क साधावा असे आवाहन ही युवासेनेने केले..

यावेळी युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, शहर युवा अधिकारी योगेंद्र माने, जिल्हा चिटणीस युवराज मोरे, उपजिल्हा युवा अधिकारी शेखर बारटक्के, शहर चिटणीस प्रथमेश देशिंगे, उपशहर युवा अधिकारी रघु भावे, चैतन्य देशपांडे, प्रतीक भोसले,अक्षय घाटगे,कीर्ती कुमार जाधव, अभि दाबाडे, युवतीसेना शहर युवतीअधिकारी सानिका दामूगडे, समन्व्यक माधुरी जाधव,उपशहर युवती अधिकारी प्रिया माने, सिद्धी दामूगडे, तसेच उपशहर युवाअधिकारी सुनील कानूरकर, निलेश सूर्यवंशी, विभाग युवा अधिकारी ऋषिकेश जोशी


अकरावी व बारावीची प्रवेश यंत्रणा कोणाच्या हस्तक्षेपाशिवाय व विनाडोनेशन प्रत्येक कॉलजने राबवावी अन्यथा विध्यार्थी आंदोलन उभारू