बातम्या

मतदान वाढीसाठी प्रत्येकाचा प्रयत्न महत्त्वाचा - डॉ. विजयकुमार पाटील

Everyone  s effort is important for voting increase  Dr Vijay Kumar Patil


By nisha patil - 4/20/2024 1:22:33 PM
Share This News:



पन्हाळा : प्रतिनिधी  मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. आपल्या घरात किती मतदार आहेत, त्यांची यादी करण्याचा गृहपाठ विद्यार्थ्यांना दिल्यास फायदा होऊ शकतो. मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ .विजयकुमार पाटील यांनी केले. शनिवारी श्रीपतराव चौगुले आर्टस ॲण्ड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली येथे झालेल्या मतदार जागृती अभियान  रॅली मध्ये मार्गदर्शन केले.
 
ज्युनिअर विभाग प्रमुख डॉ . उषा पवार  यांनी मतदार जागृतीसाठी विद्यार्थ्यांचा कसा उपयोग होऊ शकतो, हे स्पष्ट केले. प्राचार्य , शिक्षक-विद्यार्थी अशी साखळी तयार करून निवडणूकसंबंधी माहिती मतदारांपर्यंत लवकर पोहोचवता येते. हे एक प्रभावी माध्यम आहे, महाविद्यालयाच्या वतीने कॉलेज ते कोतोली गावातून  मतदार जन जागृती रॅली काढण्यात आली . कार्यक्रमाच्या प्रारंभी आर्टस ॲण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यानी  महाविद्यालय परिसरात मानवी साखळी तयार करून मतदान करण्याची जनजागृती केली. या वेळी त्यांनी विविध घोषणा दिल्या.  या वेळी प्राचार्य डॉ. विजय कुमार पाटील , ज्युनिअर विभाग प्रमुख डॉ .उषा पवार, आर .बी पाटील , संजीव कुंभार , सीमा पाटील , रवि चौगुले , प्रकाश लव्हटे , रवि पाटील , स्मिता कुंभार, चंद्रिका लिगाडे सुजाता पाटील आदी उपस्थित होते.

 


मतदान वाढीसाठी प्रत्येकाचा प्रयत्न महत्त्वाचा - डॉ. विजयकुमार पाटील