बातम्या

सर्वांनी फिल्डवर उतरा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Everyone get on the field Chief Minister Eknath Shinde


By nisha patil - 7/25/2024 12:37:38 PM
Share This News:



पुण्यात मुसळधार पावसामुळे  अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  , उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार  देखील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. 
     

 सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गाचा जोर आणखी वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनला सतर्कतेचा आदेश दिले आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. लोकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. 
           

पुण्यात पुढेही पाऊस राहणार आहे. मी तातडीने पुण्याला जात आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट केलं आहे. एकता नगरमध्ये स्वत: आयुक्त पोहचले आहेत, असं अजित पवारांनी सांगितले. जमीन कोरडी असेल तर पाऊस पडल्यानंतर पाणी शोषून घेण्याची जमिनीची तयारी असते. आत्ता जमीन सगळी गेले दोन-तीन दिवसाच्या पावसामुळे ओली आहे. पुण्यात पेव्हर ब्लॉक आणि सिमेट काॅक्रीट रस्ते आहे. पुण्यात सकाळी धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सगळीकडे पाऊस असल्याने नदी ओव्हरफ्लो झाली असल्याने सकल भागात पाणी साचलेले आहे, असं अजित पवारांनी सांगितले.


सर्वांनी फिल्डवर उतरा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे