बातम्या
समाजसेवेच्या विचारांची मशाल सर्वांनी तेवत ठेवली पाहिजे : आ.सतेज पाटील
By nisha patil - 4/2/2025 11:58:35 PM
Share This News:
शिक्षण प्रसारक मंडळ आणि भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या विद्यमाने जेष्ठ काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी आरोग्यराज्यमंत्री स्वर्गीय भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त अर्धाकृती पुतळा अनावरण आणि स्मरणिका प्रकाशन सोहळा भाईसाहेबांच्या भगिनी कुसुमताई बिलिये यांच्या हस्ते माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि आ.सतेज पाटील यांच्या उपस्थीतीत प्रेरणा समाधीस्थळ, सावंतवाडीत पार पडला.
पद्मश्री डी. वाय. पाटील साहेबांच्या बरोबर आपले असलेले स्नेहपुर्ण संबंध स्व. भाईसाहेब सावंत यांनी शेवट पर्यंत जपले. भाईसाहेबांनी प्रज्वलित केलेली सन्मान, सहकार्य आणि समाजसेवेच्या विचारांची मशाल आपण सर्वांनी तेवत ठेवली पाहिजे अशी भावना यावेळी आ.सतेज पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, प्रविण भोसले, वैभव नाईक, राजन तेली यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत, यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
समाजसेवेच्या विचारांची मशाल सर्वांनी तेवत ठेवली पाहिजे : आ.सतेज पाटील
|