बातम्या

वाचनसंस्कृती वटवृक्ष बहरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत - युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती

Everyone should try to make the banyan tree blossom


By nisha patil - 1/8/2023 1:14:04 PM
Share This News:



वाचनसंस्कृती वटवृक्ष बहरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत - युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती

सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता वाचन संस्कृतीचा प्रसार होण्यासाठी आणि वाचन संस्कृती बहरण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे ही आजची सर्वात मोठी प्राथमिक गरज आहे असे प्रतिपादन  युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी केले. त्या "राज्यस्तरीय वाचनकट्टा साहित्य पुरस्कार 2022" या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचन कट्टाचे पेट्रन व अमरावती विभागीय उपायुक्त  संजय पवार हे होते

 "सध्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात येणाऱ्या पिढीने मोबाईल व तत्सम समाज माध्यमांवरती पुस्तके वाचणे हे आवश्यक आहेच परंतु खऱ्या अर्थाने वास्तविक जीवनात पुस्तक हातामध्ये घेऊन वाचण्यात आणि ते समजून घेण्यात खरा आनंद आहे. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये नैतिकता मूल्य आणि नातेसंबंध दृढ करण्यासाठी पुस्तकांचे वाचन खरेच खूप गरजेचे आहे."युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती

  • अध्यक्ष संजय पवार यांनी अध्यक्षीय भाषणात पुस्तक कोणते वाचावे आणि पुस्तकांचे अंतरंग कसे उमजून घ्यावे याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. " सध्याच्या ऑनलाईन जमान्यांमध्ये आपणांसमोर पुस्तकांचे अनेक पर्याय एका क्लिक वरती उपलब्ध होतात. याचा आपण सर्वांनीच चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे. वाचनकट्टा चळवळ ही वाचन संस्कृती जपण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करत आहे आणि याचाच भाग म्हणून वाचन कट्टा साहित्य पुरस्कार प्रदान केला जात आहे याचे खरंच कौतुक आहे," असे प्रतिपादन पवार यांनी केले.

या कार्यक्रमात सबंध राज्यभरातील दीडशेहून अधिक लेखकांच्या साहित्य कलाकृती मधून निवडलेल्या उत्कृष्ट साहित्यिकांचा आणि त्यांच्या साहित्य कलाकृतीचा "वाचनकट्टा साहित्य पुरस्कार 2022" देऊन गौरव करण्यात आला.

उत्कृष्ट पद्य साहित्य पुरस्कार –
कविता
प्रथम (विभागून) –
आबासाहेब पाटील, बेळगांव (घामाची ओल धरून)

प्रा. प्रतिभा सराफ, मुंबई (उमलावे आतुनीच)

द्वितीय (विभागून) –
डॉ. आनंद बल्लाळ, गडहिंग्लज (स्वातंत्र्यानंतर आजही)

सौ. वैष्णवी अंदूरकर, कोल्हापूर (एकेकटे सोबत)

उत्कृष्ट गद्य साहित्य पुरस्कार-
कादंबरी
प्रथम – नंदू साळोखे, कोल्हापूर (इपळाप)
द्वितीय – इला माटे, कोल्हापूर (अजन्माच्या जन्मकळा)

कथा
प्रथम- सुनील मंगेश जाधव, पालघर (मी आहे)
द्वितीय – प्रेमनाथ रामदासी, सोलापूर (फ्युचर मॅन)

बालसाहित्य
सुनील पांडे, पुणे (टॉकी आणि टॉमी)

उत्कृष्ट संशोधन साहित्य पुरस्कार –
प्रथम – डॉ. सुवर्णा निंबाळकर, पुणे
(करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब)
द्वितीय – डॉ. राजेंद्र रंगराव राऊत, अमरावती (लीळाचरित्र )

उत्कृष्ट संकीर्ण साहित्य पुरस्कार-

वैचारिक
प्रथम – वासंती प्रकाश घाडगे, सातारा (चला लडाखला)
द्वितीय- विनायक शशिकांत होगाडे, इचलकरंजी (डियर तुकोबा)

अध्यात्म – गायत्री मुळे, नागपूर (परब्रह्म)

विशेष साहित्य सन्मान – २०२२
श्री. गणपत हरी पाटील, कोल्हापूर
डॉ. सुनीता चव्हाण, मुंबई
श्री. अजितसिंह चव्हाण, कराड
श्री. मनोहर महादेव भोसले, कोल्हापूर
डॉ. उत्तम सकट, कोल्हापूर
डॉ. मोहन लोंढे, सांगली
प्रा. आनंद गिरी, कोल्हापूर
डॉ. सयाजीराव गायकवाड, सोलापूर
डॉ. महादेव शिंदे, कोल्हापूर

यावेळी वाचनकट्टा मुख्य समन्वयक प्राचार्य रेखा निर्मळे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे सहाय्यक संचालक विजयकुमार जगताप सर, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख, कराडचे तहसीलदार श्री विजय पवार, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर, उद्योजक युवराज पाटील, विद्या प्रसारक मंडळ गडहिंग्लजचे अध्यक्ष  सतीश घाळी, डॉ.सरोज बिडकर, वाचनकट्टा उपाध्यक्ष  संतोष वडेर, सचिव सौ वनिता कदम, तृप्ती कागिणकर , ओंकार कागीनकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक  युवराज कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन  वनिता कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  वैदयी जोशी यांनी केले.


वाचनसंस्कृती वटवृक्ष बहरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत - युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती