विशेष बातम्या
माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी 31 मार्चपूर्वी नोंदणी करावी
By nisha patil - 5/2/2025 7:23:11 PM
Share This News:
माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी 31 मार्चपूर्वी नोंदणी करावी
कोल्हापूर, दि. 5 : माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, आणि अवलंबितांनी सैनिक कल्याण कार्यालयाच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च 2025 पूर्वी www.mahasainik.maharashtra.gov.in किंवा www.ksb.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
नोंदणीसाठी माजी सैनिकांना 100 रुपये फी लागेल, तर माजी सैनिक विधवा व अवलंबितांना फी माफ आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड, पॅन कार्ड, डिस्चार्ज पुस्तक, पी.पी.ओ., ई.सी.एच.एस. कार्ड, पेंशन बँक पासबुक इत्यादी – pdf मध्ये अपलोड करावी लागतील.
माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी 31 मार्चपूर्वी नोंदणी करावी
|