बातम्या

शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामुळे सोमवारच्या परीक्षा स्थगित

Exams postponed on Monday due to graduation ceremony of Shivaji University


By nisha patil - 12/14/2023 3:51:29 PM
Share This News:



 शिवाजी विद्यापीठाचा साठावा पदवीदान समारंभ सोमवारी 18 डिसेंबर रोजी होणार आहे या दिवशी पूर्वनियोजित असलेल्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या दिवशी असलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. तसेच परीक्षांचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच परीक्षा द्यावी, असे आव्हान परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव यांनी केले आहे


शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामुळे सोमवारच्या परीक्षा स्थगित