शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘स्पंदन कलाप्रदर्शन 2025’ चे उत्साहात उद्घाटन
By nisha patil - 4/3/2025 5:02:16 PM
Share This News:
‘स्पंदन कलाप्रदर्शन 2025’ चे उत्साहात उद्घाटन
कोल्हापूर (4 मार्च) – विवेकानंद कॉलेजमध्ये बी.व्होक. विभागाच्या वतीने आयोजित ‘स्पंदन कलाप्रदर्शन 2025’ चे उद्घाटन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते मा. सागर बगाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख पाहुण्यांनी "जीवनाचे मर्म कळण्यासाठी कला मदत करते" असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात मा.प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे यांनी विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा असे सांगितले. फोटोग्राफी, पेंटिंग, ग्राफिक डिझाईन, व्हिडीओग्राफी, ॲनिमेशन व हस्तकला वस्तूंचा समावेश असलेल्या या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांसह कला रसिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘स्पंदन कलाप्रदर्शन 2025’ चे उत्साहात उद्घाटन
|