शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह
By nisha patil - 2/27/2025 6:17:12 PM
Share This News:
कोल्हापूर – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात कवी कुसुमाग्रज व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. ‘कवी कुसुमाग्रज यांची कविता’ या विषयावर प्रा. राजेंद्र दास यांनी मार्गदर्शन केले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. मराठी कवितेच्या विकासात कुसुमाग्रजांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रा. दास यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढून गौरव दिन साजरा केला. पालखी पूजनानंतर ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या गजरात दिंडी निघाली. संत बाळूमामा भजनी मंडळाच्या सहभागाने कार्यक्रम रंगतदार झाला.
शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह
|