बातम्या
दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन...
By nisha patil - 10/12/2024 6:14:47 PM
Share This News:
जिल्ह्यातील दिव्यागांच्या विशेष शाळा व कर्मशाळा मधील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, रांगोळी स्पर्धा व मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, विक्री आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता श्री मंगल कार्यालय, बावडा शिये रोड, कोल्हापूर येथे होणार आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. अध्यक्षस्थानी असणार असून प्रमुख पाहुणे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे असणार आहेत. तसेच अतिरिक्त मुख्य् कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आणि जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन...
|