बातम्या

वनवास संपला! पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात, पण प्रीतम मुंडेंचा पत्ता कट

Exile is over Pankaja Munde in Lok Sabha arena for the first time but Pritam Mundes address was cut


By nisha patil - 3/13/2024 11:14:51 PM
Share This News:



 बीड:प्रतिनिधी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे, या यादीत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून तिकिट जाहीर करण्यात आले पंकजा आणि प्रीतम मुंडे  पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच पूर्वी १४ वर्षांचा वनवास असायचा. मात्र हा पाच वर्षांचा वनवास पुरे असं म्हटलं होतं. तो वनवास भाजपाची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आल्यानंतर संपला आहे. कारण पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून आता लोकसभा लढवतील. महाराष्ट्रातल्या ४८ पैकी २० नावांची घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे. एकीकडे पंकजा मुंडेंचा वनवास संपला आहे, मात्र प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

पंकजा मुंडे ११ मार्चला काय म्हटल्या होत्या?

पंकजा मुंडे २०१९ ची विधानसभा निवडणूक हरल्या
पंकजा मुंडे या विधानसभेची २०१९ ची निवडणूक हरल्या होत्या. त्यानंतर त्यांना साईड ट्रॅक करण्यात आल्याच्या चर्चा वारंवार रंगल्या. इतकंच काय त्या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जातील अशाही चर्चा रंगल्या. मात्र पंकजा मुंडे यांनी कुठल्याही चर्चांकडे लक्ष न देता आपली वाटचाल करणं सुरु ठेवलं. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांचा पाच वर्षांचा वनवास आता संपला आहे. असं असलं तरीही पंकजा मुंडेंची सख्खी बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकिट मात्र कापण्यात आलं आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

पंकजा महाराष्ट्रातल्या आक्रमक नेत्या
पंकजा मुंडे या महाराष्ट्रातल्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. २०१४ मध्ये त्यांना फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभाग सोपवण्यात आला होता. त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोपही त्या काळात झाले होते. मात्र आपल्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी सभागृहात वारंवार आक्रमकपणे उत्तर दिलं होतं. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्या हरल्या होत्या. त्यांच्या विरोधात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे निवडून आले होते. ही लढत खूप चुरशीची झाली होती. पंकजा मुंडे या मागच्या पाच वर्षांपासून भाजपासाठीच कार्यरत आहेत. मात्र त्यांच्याबाबत विविध चर्चा झाल्या. मात्र कुठल्याही चर्चांकडे लक्ष न देता त्यांनी पक्षाविषयीची निष्ठा कायम ठेवली. त्यांना आज लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपाने प्रीतम मुंडेंना लोकसभेची उमेदवारी नाकारली आहे. मात्र त्यांच्या जागी पंकजा मुंडेंना संधी दिली आहे. त्यामुळे उमेदवारी एकाच घरात राहिली आहे.


वनवास संपला! पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात, पण प्रीतम मुंडेंचा पत्ता कट