बातम्या
डी वाय पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय
By nisha patil - 2/20/2024 7:37:41 PM
Share This News:
सातारा कॉलेज ऑफ फार्मसीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या अपेक्षा चित्रे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
सातारा येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये राज्यभरातील 30 हून अधिक फार्मसी महाविद्याल्याच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्यावतीने अपेक्षा चित्रे व हर्षदा पाटील यानीं सहभाग नोंदवला होता. ‘विकसित भारत-माय व्हिजनं’ या विषयावर अपेक्षाने मांडलेल्या मतांना परीक्षकांची दाद मिळाली व तिला द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल डी. वाय. पाटील आभिमात विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी अपेक्षांचे कौतुक केले आहे.
या विद्यार्थीनीना प्राचार्य चंद्रप्रभू जंगमे व डॉ. केतकी धने यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कोल्हापूर : अपेक्षा चित्रे हिचे अभिनंदन करताना डॉ. संजय डी. पाटील. समवेत प्राचार्य चंद्रप्रभू जंगमे व डॉ. केतकी धने, डॉ. अभिनंदन पाटील.
डी वाय पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय
|