बातम्या

पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी पालकमंत्रांच्या चार कॉन्ट्रॅक्टरांच्या पार्टीला हद्दपार करा- समरजितसिंह घाटगे

Expel party of four contractors of Palak Mantra for transparent and corruption


By nisha patil - 10/24/2024 10:39:55 PM
Share This News:



कागल प्रतिनिधी कागलमधील विधानसभेची निवडणूक भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या विरोधात,भयमुक्त वातावरणासाठी, हुकूमशाही व दंडूकशाहीला धडा शिकवणारी आहे.पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी पालकमंत्रांच्या चार कॉन्ट्रॅक्टरांच्या पार्टीला हद्दपार करा.असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले.अलोट जनसागराच्या साक्षीने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कागल येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
   

  घाटगे पुढे म्हणाले,परिवर्तन घडवायचे म्हणून एवढ्या उन्हातान्हात जनसागर लोटला आहे. चुकीच्या विचारधारेला हद्दपार करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. विरोधकांच्या पायाखायची वाळू घसरल्याने ते आमच्या घरासमोर पुड्या, लिंबू,मिरची टाकत आहेत.जेवढ्या पुड्या टाकायच्या तेवढ्या टाका.यावरूनच तुम्ही पराभव मान्य करत असून पुरोगामीची भाषा तुम्हाला शोभत नाही.पालकमंत्री मुश्रीफांनी शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भातील खोटा जीआर काढून शेतकऱ्यांना फसवलं. शक्तिपीठ महामार्ग रद्द झालेला नाही.पण काळजी करू नका महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर शक्तीपीठ महामार्ग रद्दचा पहिला जीआर रद्द करण्यासाठी आमदार सतेज पाटील व आम्ही संयुक्तपणे पाठपुरावा करू.
 

पालकमंत्री महोदय कधीतरी आयुष्यामध्ये कोणाबरोबर तरी प्रामाणिक राहणार आहेत की नाहीत. या गद्दारीला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. त्यासाठी मी आपल्याला एवढंच सांगतो हा समरजीतसिंह घाटगे तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे. मी आपल्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे.कागल तालुक्यात  विकासकामांत ७०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण चर्चेत आहे.पालकमंत्र्यांचे लाडके चारच कॉन्टॅक्टर यामध्ये सहभागी असावेत. राज्यामध्ये लाडकी बहीण योजना तर कागलमध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आहे.ही चुकीची विचारधारा  थांबवायची आहे. 
 

  गोकुळचे माजी चेअरमन  रणजीत पाटील म्हणाले," विरोधकांना पराभव दिसू लागल्याने ते दंडूकशाहीचा वापर करतील. त्यांच्या दडपणाला बळी पडू नका अतिशय खालच्या पातळीवर राजकारण विरोधकांकडून सुरू आहे."
 

   काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले, ज्येष्ठ  नेते शरदचंद्र पवार,उद्धव ठाकरे आणि सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात वाढलेली झुंडशाही गाडण्यासाठी सर्वांनीच परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकत्र येऊया."स्वागत व प्रास्ताविक प्रा.सुनिल मगदूम यांनी केले. यावेळी शिवानंद माळी, संभाजीभोकरे,बाळासाहेब हेगडे,गौरव पनोरेकर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे,अखिलेशराजे घाटगे,श्रेयादेवी घाटगे,यश घाटगे,करणसिंह घाटगे, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी,शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ,राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील बाबासाहेब पाटील( खातेदार), जनार्दन निऊंगरे,संतोष चिक्कोडे,एकनाथ देशमुख,सुनिल गुरव,युवराज बरगे, भिमराव कोमारे, यांच्यासह  कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार राजू जाधव यांनी मानले.


स्वाती कोरींचा मोठ्या बहिणीप्रमाने मान-सन्मान राखू जनता दलाचे ज्येष्ठ नेते  माजी आमदार स्व.श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वातीताई कोरी यांनी आम्हाला कागल गडहिंग्लज उत्तूरमधील परिवर्तनाच्या लढाईत जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोठे बळ मिळाले आहे.येत्या काळात स्वातीताईंचा मोठ्या बहिणी प्रमाणे मानसन्मान राखू. अशी ग्वाही घाटगे यांनी यावेळी दिली

कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह

समरजितसिंह घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागल गडहिंग्लज उत्तूर  विभागातून आबालवृद्धांसह तरुणांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत प्रचंड गर्दी केली होती.हालगिचा कडकडाट, कैताळ व तुतारीचा निनाद व ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते मोठ्या उत्साहात गैबी चौकात उत्स्फूर्तपणे एकत्र आले.यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. गैबी चौकातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यार्यंत राजे समरजीतसिंह घाटगे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतले.
 रणरणत्या उन्हात ही कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्तपणा ओसंडून वाहत होता, गैबी चौक ते एसटी स्टँड जवळील शिवाजी महाराज 
चौकापर्यंतचा परिसर  रॕलीतील कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता..

चौकट ३
लक्षवेधी फलक

 वारसा शाहूंचा-लढा सर्वसामान्यांचा, गाढूया गद्दारी-वाजवूया तुतारी,राम कृष्ण हरी - वाजवा तुतारी, ठरलं तर मग आता समरजीतसिंह राजेच आमदार, डर जरुरी है, बदल हवा..तर आमदार नवा.. गाढूया मंत्र्यांची गद्दारी वाजुया समारजित राजेंची तुतारी,नको ईडी..नको गद्दार आता समरजीतसिंह राजेच आमदार.. अशा आशयाचे लक्षवेधी  फलक झळकवत कार्यकर्ते तशा घोषणा देत होते.


पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी पालकमंत्रांच्या चार कॉन्ट्रॅक्टरांच्या पार्टीला हद्दपार करा- समरजितसिंह घाटगे