बातम्या

मंदिरांच्या शेतजमिनी बळकावण्याचे प्रकार उघड

Exposing methods of grabbing agricultural land of temples


By nisha patil - 1/22/2025 5:25:47 PM
Share This News:



मंदिरांच्या शेतजमिनी बळकावण्याचे प्रकार उघड

‘अँटी लँड ग्रॅबिंग अ‍ॅक्ट’ लागू करण्याची मागणी

मंदिरांच्या शेतजमिनी बेकायदेशीर हस्तांतरणाच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग अ‍ॅक्ट’ लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारले.

महाराष्ट्रातील मंदिरांच्या शेतजमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग अ‍ॅक्ट’ लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर करण्यात आले.या बैठकीत जिल्हा संयोजक प्रमोद सावंत, सहसंयोजक अभिजित पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. शाहूवाडीतही तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.


मंदिरांच्या शेतजमिनी बळकावण्याचे प्रकार उघड
Total Views: 31