बातम्या

सीपीआर मधील नेत्र शस्त्रक्रिया आजपासून सुरू

Eye surgery in CPR starts from today


By nisha patil - 10/19/2023 3:41:53 PM
Share This News:



सीपीआर मधील नेत्र शस्त्रक्रिया आजपासून सुरू

सीपीआरच्या नेत्र शस्त्रक्रिया गृहाला संसर्ग झाल्याने सुमारे आठवडाभर येथील नेत्र शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या परंतु या शस्त्रक्रिया ग्रहाचे निर्जंतुकीकरण केल्यानंतरचा तिसरा अहवाल ही निगेटिव्ह आल्यामुळे आता आज गुरुवारपासून पुन्हा नेत्र शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत

 सीपीआर मधील शस्त्रक्रिया गृह निर्जंतुकीकरण करून झाल्यानंतर त्यामध्ये काही विषाणू आहेत का याची तपासणी केली जाते त्यासाठी तेथील स्वॅप घेण्यात येतात अशाच पद्धतीने स्वाप घेतला असता या शस्त्रा क्रियागृहामध्ये संसर्ग झाल्याचा पॉझिटिव अहवाल बुधवारी दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी आला त्यानंतर हे थेटर शस्त्रक्रियांसाठी बंद ठेवण्यात आले यातील ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत त्यांना दक्षतेसाठी ठेवून घेण्यात आले होते आणि अन्य शास्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या


सीपीआर मधील नेत्र शस्त्रक्रिया आजपासून सुरू
Total Views: 2