बातम्या
कारखान्यांनी मागील उस गळीत हंगामातील 100 रुपयांचा दुसरा हप्ता तात्काळ द्यावा .. आंदोलन अंकुश .
By nisha patil - 9/3/2024 9:37:06 PM
Share This News:
कारखान्यांनी मागील उस गळीत हंगामातील 100 रुपयांचा दुसरा हप्ता तात्काळ द्यावा .. आंदोलन अंकुश .
चालु ऊस आंदोलनामध्ये संघटनांनी गेल्या हंगामात झालेला अतिरिक्त नफा दुसर्या हप्त्याच्या रुपात शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी केली होती त्याप्रमाणे कारखानदार शेतकरी यांची जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांच्या कार्यालयात बैठक होऊन गळीत हंगाम सन 22- 23 हंगामामध्ये गेलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी 3000/रुपये पेक्षा कमी दर दिलेला आहे अशा कारखान्याने 100/रुपये व 3000/ पेक्षा जास्त दर दिलेल्या कारखान्याने 50/ रुपये दोन महिन्यामध्ये देण्याचे ठरले होते पण सध्या हंगाम संपत आला तरी साखर कारखानदार त्याबाबत बोलायला तयार नाहीत तसेच शासन सुद्धा याकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे ठरल्याप्रमाणे मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा अन्यथा चेअरमन एमडी यांना घेराव घालून आंदोलन करण्यात येईल तसेच साखर इथेनॉल वाहतूक रोखली जाईल असा इशारा आंदोलन अंकुश संघटने कडून श्री दत्त शेतकरी साखर कारखाना शिरोळ व गुरुदत्त शेतकरी साखर कारखाना टाकळीवाडी यांना निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे तालुकाध्यक्ष दीपक पाटील महेश जाधव संताजी पाटील एकनाथ माने राजू कोंडाई अजित पाटील संतोष मिरजे उदय पाटील प्रवीण माने संजय पाटील सचिन वाणी इत्यादी शेतकरी उपस्थित होते .
कारखान्यांनी मागील उस गळीत हंगामातील 100 रुपयांचा दुसरा हप्ता तात्काळ द्यावा .. आंदोलन अंकुश .
|