बातम्या

सोलापूर-रत्नागिरी महामार्गासाठी शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला द्यावा...

Fair compensation should be given to farmers for Solapur


By nisha patil - 4/3/2025 10:10:08 PM
Share This News:



सोलापूर-रत्नागिरी महामार्गासाठी शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला द्यावा...

आमदार अशोकराव माने यांची  मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोलापूर ते रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक दरम्यान अपूर्ण असलेल्या जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी मोबदला मिळत असल्याने अन्याय होत आहे. या संदर्भात हातकणंगलेचे आमदार डॉ. अशोकराव माने व शिरोळचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत शेतकरी शिष्टमंडळासह बैठक घेण्याची मागणी केली.

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सचिवांना बैठक घेण्याचे निर्देश दिले.दरम्यान, 'शिवाजी विद्यापीठाचे' नाव 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' करावे, यासाठी दिलेल्या मागणीवरही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.


सोलापूर-रत्नागिरी महामार्गासाठी शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला द्यावा...
Total Views: 33