बातम्या
हातकणंगलेत अशोकराव माने यांच्या विजयात कुटुंबीय आणि समर्थकांचा महत्त्वाचा वाटा..
By nisha patil - 11/26/2024 11:04:54 PM
Share This News:
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे विद्यमान आमदार अशोकराव माने यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवत काँग्रेसचे उमेदवार राजू बाबा आवळे आणि तिसऱ्या आघाडीचे उमेदवार सुजित मिनचेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. या विजयाच्या यशामागे केवळ त्यांचे नेतृत्वच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांची आणि कार्यकर्त्यांची साथ महत्त्वाची ठरली आहे.अशोकराव माने यांना त्यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्या कुटुंबीयांची मोठी मदत मिळाली. त्यांच्या भाच्यांपासून सुनांपर्यंत प्रत्येक सदस्याने त्यांच्या विजयात योगदान दिले. त्यांचे भाचे रवीकिरण गवळी भारतीय जनता पार्टी, राजारामपुरी मंडळ कोल्हापूरचे सरचिटणीस म्हणून प्रभावी भूमिका निभवत असून अशोकराव माने यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी बरीच मेहनत घेतली.
डॉक्टर नीता माने या जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष म्हणून जनतेत चांगलाच परिचित असून जनमानसात त्यांचा चांगलाच प्रभाव आहे . डॉक्टर नीता माने यांनीही मोठ्या प्रमाणावर प्रचारात सहभाग घेत अशोकराव माने यांच्या विजयात योगदान दिले. याशिवाय कुटुंबातील धाकट्या सुनबाई सारिका माने स्वामी समर्थ महिला मागासवर्गीय सूतगिरणी, ठाणे या संस्थेच्या संचालिका म्हणून कार्यरत राहून महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले. याशिवाय मुलगी अश्विनी गायकवाड स्वामी समर्थ महिला मागासवर्गीय सूतगिरणीच्या संचालिका म्हणून त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. याशिवाय त्यांच्या पत्नी रेखा माने, त्यांचा मुलगा अरविंद माने व अभिषेक माने यांनी अथक परिश्रम घेतले. याव्यतिरिक्त अशोकराव माने यांच्या विजयात कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले. तालुक्यातील प्रत्येक गावात दौरा करत, जनतेशी थेट संवाद साधत, त्यांनी विजयाचा पाया मजबूत केला.या विजयाने संपूर्ण शिरोळ गावात उत्साहाचे वातावरण आहे. समर्थक आणि कुटुंबीय या यशाचा साजरा करताना अभिमान व्यक्त करत आहेत. माने कुटुंबाचे हे एकत्रित प्रयत्न आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य हातकणंगलेच्या राजकारणातील नवीन अध्याय ठरले आहे.
अशोकराव माने यांनी केवळ विजय मिळवला नाही, तर जनतेच्या विश्वासावर आपले स्थान मजबूत केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील हा विजय कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे प्रतीक आहे."अशोकराव माने यांचा हा विजय म्हणजे नेतृत्व, कुटुंबाचा पाठिंबा, आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम यांचे सुवर्णमध्य ठरला आहे."
हातकणंगलेत अशोकराव माने यांच्या विजयात कुटुंबीय आणि समर्थकांचा महत्त्वाचा वाटा..
|