बातम्या

प्रसिद्ध कॉमेडी यूट्यूबर देवराज पटेलचे निधन

Famous comedy YouTuber Devraj Patel passed away


By nisha patil - 6/27/2023 1:43:54 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  रायपूर छत्तीसगडमधील प्रसिद्ध कॉमेडी यूट्यूबर देवराज पटेल याचे रस्ते अपघातात निधन झाले. वेगवान ट्रकने देवराजच्या दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल दुपारी ३:३० च्या सुमारास रायपूरच्या तेलीबंधा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. देवराजच्या निधनाने त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
देवराजचे ‘दिल से बुरा लगता है’, हे वाक्य नेटकऱ्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. देवराजने निधनाच्या चार तास आधी एक व्हिडीओ बनवून पोस्ट केला होता. हा व्हिडीओ शूट करण्यासाठी तो नवे रायपूर येथे गेला होता. मात्र, परतीच्या प्रवासात त्याचा अपघात झाला. या व्हिडीओमध्ये त्याने सर्वांना अलविदा म्हटले आहे. तो अवघा २१ वर्षांचा होता. सध्या तो बीएच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता. देवराजने २०२१ मध्ये प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम सोबत कॉमेडी वेब सिरीज ‘धिंडोरा’मध्ये काम केले होते. देवराजच्या निधनाची बातमी कळताच त्याच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले. या घटनेवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी देवराजचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.


प्रसिद्ध कॉमेडी यूट्यूबर देवराज पटेलचे निधन