बातम्या
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्यासोबत संवाद...
By nisha patil - 6/24/2023 9:46:36 AM
Share This News:
कोल्हापूर- अलीकडे समाजात सामाजिक व राजकीय परिस्थिती दूषित झाली आहे. लोकशाही व संविधानाला धरून वकिलांनी आपली मतं व्यक्त करणे, सोशल मीडियावर अत्यंत कायदेशीर भूमिका मांडणे ही मोठी जबादारी आज वकिलांवर आहे. वकिलीचे व कायद्याचे तज्ज्ञ असणाऱ्यांनी कोणत्याच बेकायदेशीर व घटनाबाह्य वर्तनाचे समर्थन करण्यातून सामान्य माणसांच्या मनात कायद्याबद्दल आदर उरणार नाही. याबाबत महाराष्ट्रातील वकील काय करू शकतात? यावर चर्चा करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह लॉयर्स असोसिएशन, कोल्हापूर व वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मानव अधिकार अभ्यासक व प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्यासोबत एका सामुहिक संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दि. २५ जून २०२३ रोजी दु. ४ वाजता न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश टी. व्ही. नलवडे हे भूषविणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, ॲड. हेमा काटकर, सृजनशक्ती श्रमिक फाउंडेशनचे अध्यक्ष एस. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला कायद्याचे अभ्यास, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रोग्रेसिव्ह लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अजित चव्हाण व वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांनी केले आहे.
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्यासोबत संवाद...
|