बातम्या
कोडोलीत गव्यांच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत...!
By nisha patil - 6/26/2023 4:15:14 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली इथं वारणा उजवा कालव्याच्या परिसरात गव्यांच्या एका मोठ्या कळपाचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे,पन्हाळ्याच्या पायथ्याहून गव्यांचा कळप कोडोलीच्या दिशेने जात असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली, या कळपामध्ये मोठ्या प्रमाणात गवे असल्याने शेतकऱ्यांना सावधानता बाळगण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आलंय. दरम्यान या गव्यांच्या कळपाचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी कोडोली ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली असून, गवाचा कळप अध्याप कोडोली परिसरात वास्तव्यास असल्याचे माहिती मिळत आहे. तारा न्यूजसाठी कुंभोज हुन विनोद शिगे
कोडोलीत गव्यांच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत...!
|