विशेष बातम्या
वारणेची पाणी पातळी खालावल्याने शेतकरी चिंतेत
By nisha patil - 6/13/2023 4:53:57 PM
Share This News:
वारणा नदीची पाणी पातळी पूर्णपणे खालवली असून शेतीसाठी सुरू असणारा पाणीपुरवठा लवकरच बंद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिणामी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून शेतीतील अनेक पिके वाळत असल्याचे सध्या चित्र कुंभोसह परिसरात दिसत आहे. परिणामी आणखी काही पावसाने हुलकावणी दिल्यास पूर्णपणे पिके करपून जाणार असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. वळीव पावसाने कुंभोसह परिसरात अद्यापही हजरी न लावल्याने आधीच अडचणीत असणारा शेतकरी आता नदीतील पाणी पातळी ही खालवल्याने पूर्णपणे अडचणीत आला आहे त्याच पद्धतीने शेतातील विधी व बोरवेल यांचे पाणी क्षमता अवघ्या काही मिनिटावर येऊन थांबली असल्याने शेतकऱ्याला हाता तोंडाला लावलेली पिके जगवणे मुश्किल झालेले आहे. तारा न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे
वारणेची पाणी पातळी खालावल्याने शेतकरी चिंतेत
|