बातम्या

शासन मान्यता दुधाचा दर शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे

Farmers must get government approved milk price


By nisha patil - 10/30/2023 8:27:25 PM
Share This News:



राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघ यांना किमान गाय दूध दर निश्चित करण्याबाबत निर्देश  शासनाने दिलेले असूनही गोकुळ दूध संघाने गायीचे दूध खरेदी दरात  कपात केली आहे   शासन परिपत्रकाप्रमाणे गुण प्रतीच्या गाय दुधाकरिता किमान रुपये 34 प्रति लिटर या दरात शासन मान्यता देण्यात आली आहे तसेच सदरचे दर विना कपात दूध उत्पादक शेतकरी यांना अदा करणे अभिप्रेत असून सदरचे दर हे दिनांक 21 -7-2023 पासून अमलात आले आहेत,

हे निर्देश  दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता लोक हितास्तव करणेत आले आहेत  . गोकुळ दूध संघाचे काम कायद्याच्या विरोधात सुरू असून त्याची सरळ सरळ  या निर्देशांची पायमल्ली केली जात आहे, शासनाने निर्देश दिल्याप्रमाणेना कपात गायीच्या दुधाचा दर 34 रुपये देण्यात यावा असे असताना गोकुळ संघाची मनमानी कशासाठी? गोकुळ दूध संघ शेतकरी दूध उत्पादक यांचा आहे की संचालकांचा? काही दिवसामागे वीस लाख लिटर दूध संकलन करण्यासाठी काही कोटी रुपये खर्च करून विस्तारीकरण करण्यात आले व त्याच बरोबर नोकर भरती सुद्धा करण्यात आली एवढे करून सुद्धा संकलन फक्त 14 लाख लिटरच होत आहे म्हणजेच दूध संघाचे धोरणच चुकीचे आहे यामुळे साधारण 5.50 लाख शेतकरी यांची फसवणूक होत आहे. 
 
 तरुणांनी कर्ज काढून गाईच्या गोठ्याचे प्रकल्प राबवले आहेत या कपातीमुळे ते कर्जाचे हप्ते  फेडू शकत नाहीत ,त्याचे काय करायचे? याच दूध संघाचे नेतृत्व करणारे माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्याच दूध संघात शासनाने दिलेल्या निर्णयाची पायमल्ली कशी होते? याचा त्यांनी खुलासा करणे गरजेचे आहे ,सत्ताधारी, संचालक गप्प आहेत हे आम्ही समजू शकतो. पण या महत्त्वाच्या शेतकरी संबंधाच्या  विषयावर विरोधी संचालकांनी तोंडाला कुलूप का लावले आहे? अध्यक्षांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी  या गंभीर बाबींचा विचार करून गाईचा दूध दर शासनाच्या निदर्शनाप्रमाणे  रुपये 34 देण्यासंदर्भात तातडीने विचार करावा तसेच जर का गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासंदर्भात टाळाटाळ करत असेल तर शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करावा  अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्याला जाब विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा हि देणेत आला

यावेळी  संजय पवार,विजय देवणे, रविकिरण इंगवले,सुनील मोदी,राजू यादव, सागर पाटील, संतोष चौगुले, तानाजी आंग्रे, भरत आमते, जीवन पाटील, विराज पाटील, धनाजी दळवी, धनाजी यादव, विशाल सूर्यवंशी, विशाल देवकुळे, अभिजीत पाटील, विनोद खोत, पोपट दांगट , दिलीप साळुंखे, मंजित माने , सरदार तीप्पे, भीमराव पाटील, कृष्णात कदम, बाजीराव पाटील, दिनेश परमार, दत्ताजी टिपुगडे, विवेक काटकर, बाजीराव जाधव, अवधू साळुंखे, हर्षल सुर्वे, शशिकांत बिडकर, महेश उत्तुरे, प्रतिज्ञा उत्तरे, शांताराम पाटील, प्रसाद कुलकर्णी, सुरेश पोवार , प्रशांत पोवार, रणधीर पाटील, पवन तोरस्कर, प्रकाश पाटील,हे उपस्थित होते


शासन मान्यता दुधाचा दर शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे