शेतकऱ्यांनी गुणवत्ता दर्शक बियाणे व खतेच खरेदी करावीत- जिल्हा परिषद कृषी विभाग
By nisha patil - 3/6/2023 6:53:13 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) पुढील काही दिवसांत मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या दृष्टीने मशागती पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांकडून बी-बियाणे देखील खरेदी करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके औषधे खरेदी करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं
केले आहे.
शेतकऱ्यांनी बनावट, भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह खरेदी करावेत. पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन पीक निघेपर्यंत पावती सांभाळून ठेवावी. खरेदी केलेल्या बियाणाचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणाची पॉकेट सिलबंद असल्याची खात्री करावी.
बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्या व सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता घरी तपासणी करुन पेरणी करावेत. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. किटकनाशके अंतिम मुदतीच्या आत असल्याची खात्री करावी. विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोननंबर दिलेले आहेत. अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.s
शेतकऱ्यांनी गुणवत्ता दर्शक बियाणे व खतेच खरेदी करावीत- जिल्हा परिषद कृषी विभाग
|