बातम्या
सौर कृषी पंप योजनेबाबत सावधानतेचे शेतकऱ्यांना आवाहन
By nisha patil - 12/30/2023 3:27:25 PM
Share This News:
सौर कृषी पंप योजनेबाबत सावधानतेचे शेतकऱ्यांना आवाहन
राज्यात पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना (घटक-ब) राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना जलस्त्रोतावर पारंपरिक वीज जोडणी नसल्यास तीन, पाच आणि ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहीत सौर कृषी पंप 'महाऊर्जा'कडून अनुदान तत्वावर वितरीत करण्यात येत आहेत.याकरिता केंद्र आणि राज्य शासनामार्फत खुल्या प्रवर्गातील शेतकन्यांसाठी ९० टक्के आणि अनुसुचित जाती-जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ९५ टक्के इतके अनुदान दिले जाते.
परंतु, सध्या वेगवेगळ्या प्रकारचे काही बनावट संकेतस्थळे, सोशल मीडियातून मिळाणाऱ्या माहितीतून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शिवाय शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे ई-संदेशही पाठविण्यात येत असल्याचे दिसले आहे. तेव्हा अशा प्रकारच्या बनावट आणि फसव्या संकेतस्थळापासून शेतकऱ्यांना सावध राहावे, असे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे महाव्यवस्थापक समुद्रगुप्त पाटील यांनी पत्रकाद्वारे केले.
सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांस १० टक्के आणि अनुसुचित जाती-जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांस ५ टकके लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा ई-संदेश अर्जात नोंद केलेल्या दुरध्वनी क्रमांकावर पाठविला जातो, असे पत्रकात म्हटले आहे.
सौर कृषी पंप योजनेबाबत सावधानतेचे शेतकऱ्यांना आवाहन
|