बातम्या

काटामारी रोखण्यात शेतकरी वजन काटा यशस्वी

Farmers weigh forks successful in preventing drought


By nisha patil - 1/1/2024 11:21:01 PM
Share This News:



काटामारी रोखण्यात शेतकरी वजन काटा यशस्वी  
आंदोलन अंकुश ने  शेतकरी वजन काट्याची केली होती उभारणी

 उसाच्या वजनात काटामारी होते हे उघड सत्य होते. तसेच काटामारी मुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे हे पाहून, या काटामारीवर उत्तर म्हणून आणि काटामारी हा विषय मुळातून सोडवण्याच्या उद्देशाने आंदोलन अंकुश ने  शेतकरी वजन काट्याची उभारणी केली होती. शिरोळ  भागातील साखर कारखान्यांच्या वजन काट्यावर येणारे वजन व  शेतकरी वजन काट्यावर येणारे वजन यामधील तफावत ही सरासरी 20 किलो ते 150 किलो या दरम्यान स्थिर आहे आणि यावरूनच आम्हाला वाटते की काटामारी रोखण्यात शेतकरी वजन काटा यशस्वी झाला आहे.ऊस हंगामाच्या एक महिन्याच्या कालावधीत शेतकरी वजन काट्यावर जी 600  च्या आसपास वाहनांची जी वजणे झाली आहेत त्यावर आधारित हे निष्कर्ष आहेत. या काट्यावर भागातील गुरुदत्त, जवाहर, दत्त ,शरद, पंचगंगा ,दत्त इंडिया व कर्नाटक मधील वेंकटेश्वरा या साखर कारखाण्यांची वाहने वजन करून गेलेली आहेत.

या शेतकरी वजन काट्यामुळे या भागातील काटामारी ला चाप लागल्याचे स्पष्ट झाले असून शेतकऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या उसाची होणारी काटामारी रोखल्याचे महाराष्ट्रातील हे पहिलेच उदाहरण आहे.

महाराष्ट्रातील तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या भागात सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या मालकीचे वजन काटे उभारून काटामारी रोखावी असे आंदोलन अंकुश चे आवाहन आहे

आंदोलन अंकुश या नावाचा दबदबा

खाजगी काट्यावर वजन करून आलेल्या वाहनाला कारखान्याकडून त्रास दिला जातो,ऊस स्वीकारला जात नाही किंवा कारखान्याकडून ऊस तोड बंद केली जाते अशा चर्चा असायच्या त्यामुळे खाजगी काट्यावर वजन करायला वाहनधारक किंवा शेतकरी तयार होत नसत पण शेतकरी वजन काट्यावर वजन झालेल्या 600 वाहनधारकांना किंवा शेतकऱ्यांना कोणत्याही कारखाण्याने त्रास देणे सोडाच साधी विचारणा पण केली नाही. यावरून आंदोलन अंकुश या नावाचा दबदबा लक्षात येतो.

मोफत वजनाचे वचन पाळले 

काटा उभारणी दरम्यान उसाच्या वाहनाचे मोफत वजन करून दिले जाणार असे शेतकऱ्यांना वचन दिले होते त्यानुसार या काट्यावर उसाचे मोफत वजन करून दिले जात आहे पण काट्यावर ठेवलेल्या मदत निधी डब्यात शेतकऱ्यांनी स्वताहून 6000 रुपये एका महिन्यात देऊन आपला दानशूरपणा दाखवला आहे.

रिकाम्या वाहनाची वजणे तंतोतंत

शेतकरी वजन काट्यावर आलेल्या जवळपास सर्वच रिकाम्या वाहनाचे वजन व कारखाण्याच्या काट्यावर आलेले वजन यात अजिबात तफावत दिसली नाही. अनेक वाहणाच्या ड्रायवरकडे विचारणा केली असता उसाने भरलेले वाहणाचे वजन करण्यासाठी व रिकाम्या वाहणाचे वजन करण्यासाठी कारखान्यात स्वतंत्र काटे वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उसाने भरलेले व रिकामे वाहन एकाच काट्यावर वजन करणे बंधनकारक आहे तसे साखर आयुक्तांचे आदेश असताना कारखाने ते पाळताना दिसत नाहीत.
काटामारी चे हेच प्रमुख कारण असल्याचे आमचे मत आहे.


काटामारी रोखण्यात शेतकरी वजन काटा यशस्वी