बातम्या

दाऊदवाडी ( राधानगरी ) येथे भीषण अपघात

Fatal accident at Dawoodwadi Radhanagari


By nisha patil - 3/23/2024 10:23:05 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे राधानगरी : प्रतिनिधी गोव्याहून कोल्हापूरला येणाऱ्या मारुती ब्रिझा गाडीला ट्रकने दिलेल्या जोरदार धडकीमध्ये मंगळवार पेठ येथील अविनाश शिंदे व त्यांच्या कुटुंबातील 4 जण अपघातात गंभीर जखमी झाले.
   

MH O7 AJ 1905 क्रमांकाच्या   ट्रकवरील मद्यधुंद चालकाने बेदकारपणे गाडी चालवत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या मारुती ब्रिझा कारला समोरून जोरदार धडक दिल्याने 23 BH 6981G या क्रमांकाच्या कारचे प्रचंड नुकसान होऊन कार मधील अविनाश शिंदे यांच्यासह श्रीमती कमल शिंदे , पूनम शिंदे , कु प्रणिल शिंदे हे अत्यंत गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यास अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.
     

याप्रकरणी राधानगरी पोलिसांना कळवून जखमी फिर्यादी मार्फत रुग्णालयातून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून सर्वसामान्यांच्या जीवावर उठणाऱ्या  ट्रकचालक व मालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिंदे कुटुंबाकडून पोलिसांकडे  करण्यात आली.


दाऊदवाडी ( राधानगरी ) येथे भीषण अपघात