बातम्या

बिग बॉस’वरून अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला

Fatal attack on actress from Bigg Boss


By nisha patil - 11/27/2023 5:41:42 PM
Share This News:



 बिग बॉस तमिळची माजी स्पर्धक आणि दाक्षिणात्य अभिनेत्री वनिता विजयकुमार हिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पार्किंग परिसरात एका व्यक्तीने वनिताच्या चेहऱ्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर वनिताने सोशल मीडियावर पोस्ट करत याबदल माहिती दिली आहे.

 दाक्षिणात्य अभिनेत्री आणि ‘बिग बॉस तमिळ’ या शोची माजी स्पर्धक वनिता विजयकुमारबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. वनितावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात वनिताला बरीच दुखापत झाली असून तिचा चेहरा पूर्णपणे सुजला आहे. त्याचा फोटो वनिताने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिची ही अवस्था पाहून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हा हल्ला कसा आणि कधी केला, याबद्दलची माहिती वनिताने तिच्या पोस्टद्वारे दिली आहे.
      माझ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दलची ही पोस्ट मी अत्यंत धाडसाने लिहित आहे. बिग बॉस तमिळ हा टीव्हीवरील फक्त एक गेम शो आहे. त्यामुळे माझ्यावर होणारा हल्ला चुकीचा आहे. देव जाणो, माझ्यावर कोणी इतका निर्दयी हल्ला केला..  मी बिग बॉस तमिळ 7 चा रिव्ह्यू संपवला आणि रात्रीचं जेवण जेवले. जेवल्यानंतर मी कारच्या दिशेने निघाली. बहीण सौम्याच्या घराच्या पार्किंग परिसरात मी माझी गाडी पार्क केली होती. तिथे अंधार होता आणि अचानक एक व्यक्ती समोर येऊन  माझ्या चेहऱ्यावर जोरजोरात मारू लागला. मी बचावासाठी ओरडत होते आणि त्याने तिथून पळ काढला. माझ्या चेहऱ्यावरून रक्त येत होतं आणि मी मदतीसाठी ओरडत होते’, असं तिने लिहिलं.
   घटनेविषयी वनिताने पुढे सांगितलं, ‘जवळपास तासभर माझ्याजवळ कोणीच नव्हतं. मी माझ्या बहिणीला खाली बोलावलं आणि तिने माझ्याकडे पोलिसांत तक्रार दाखल करण्याची विनंती केली. पण या प्रक्रियेवर माझा विश्वास नसल्याचं मी तिला म्हणाले. मी स्वत:वर उपचार करून घेतले. पण माझ्यावर कोणी हल्ला केला, हे मी जाणू शकले नाही असे ती म्हणाली


बिग बॉस’वरून अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला