विशेष बातम्या
परीक्षेदिवशी वडिलांचे निधन व नेहाने मिळवलेली यश, तिच्या डोळ्यात येणारे पाणी दानशूराना मदतीची हाक मारत आहे
By nisha patil - 3/6/2023 6:52:03 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे)
कुंभोज तालुका हातकणंगले येथे एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या नेहा नंदकुमार माळी या विद्यार्थिनी बाहुबली एमजी शहा विद्यामंदिर येथे दहावी परीक्षेत 95 टक्के गुण प्राप्त केले आहेत.परीक्षेच्या आदल्या दिवशी वडिलांचे झालेले दुःख निधन, स्वतःवर व कुटुंबावर ढासळलेला दुःखाचा डोंगर व हे सर्व करत असताना समोर असणारी दहावी बोर्डाची परीक्षा हे नेहा समोरील एक मोठे आव्हानच होते. नेहाने वडिलांचे दुःख बाजूला ठेवून मोठ्या देहाने दहावी बोर्डाची परीक्षा दुःखाचे सावट मनावर घेऊन दिली. परिणामी दहावी बोर्डाच्या परीक्षेत नेहाला 95 टक्के गुण प्राप्त झाले. नेहाने मिळवलेले यश हीच खरी वडिलांना श्रद्धांजली अशी चर्चा सध्या कुंभोज ग्रामस्थातुन रंगत असून, एका सर्वसामान्य माळी कुटुंबात जन्माला आलेल्या नेहाने मिळवलेले उल्लेखनीय यशाची चर्चा सर्व परिसरात रंगत आहे.
याबाबत नेहाला विचारले असता एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात आपला जन्म झाला असून आई-वडिलांच्या आशीर्वादाने आपण दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. दहावी परीक्षेतच वडिलांचे निधन झाल्याने मनावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला पण आपले यश हीच वडिलांना श्रद्धांजली ठरणार या अपेक्षेने मी परीक्षा दिली व त्यामध्ये मला चांगले यश प्राप्त झाले. मला कॉम्प्युटर इंजिनिअर होण्याची इच्छा असून माझ्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे ती इच्छा पूर्ण होईल का नाही याकडे माझी लक्ष वेधले असून, मला कसल्याही परिस्थितीत काँम्प्युटर इंजिनिअर व्हायचे आहे. असेही नेहा माळीने बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी तिच्या डोळ्यात आलेले पाणी अनेक दानशूर व्यक्तींना मदतीची हाक मारत असल्याचे चित्र दिसत होते.
परिणामी परिस्थितीने गरीब असली तरी बुद्धीने हुशार असणाऱ्या नेहा माळीला अशोक रावजी माने इंजिनिअरिंग कॉलेज अथवा डिकेटि काँलेज इचलकरंजी येथे इंजिनिअरिंग पूर्ण करावयाची इच्छा असून त्यासाठी तिला दोन्ही कॉलेजचे व्यवस्थापनाच्या मदतीची अपेक्षा आहे. यावेळी नेहा माळी हिचा सत्कार साथ मित्रांची तरुण मंडळ किरण माळी युवा मंच व ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने करण्यात आला.
परीक्षेदिवशी वडिलांचे निधन व नेहाने मिळवलेली यश, तिच्या डोळ्यात येणारे पाणी दानशूराना मदतीची हाक मारत आहे
|