बातम्या
संक्रांतीचा उत्सव: परंपरेचा गोडवा आणि उत्साहाचा संगम
By nisha patil - 1/14/2025 6:35:40 PM
Share This News:
संक्रांतीचा उत्सव: परंपरेचा गोडवा आणि उत्साहाचा संगम
मकर संक्रांती हा आपल्या भारतीय संस्कृतीतील पहिला सण, जो निसर्गाशी जोडलेला आहे, आज देशभरात सर्वत्र मकर संक्रांतिउत्साहात साजरी होत आहे. या सणाचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि निसर्गाशी नाळ जोडणारेही आहे.
गोड बोलून तिळगुळाचा गोडवा वाटणाऱ्या या सणाचा मुख्य संदेश आहे – एकोप्याने राहणे आणि गोड संबंध निर्माण करणे. घराघरात तयार होणारे तिळाचे लाडू, भेटीगाठी, पतंगबाजीचा आनंद, आणि महिलांच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांतून या सणाचा आनंद द्विगुणीत होतो.
संक्रांतीचा हा सण आपल्याला परंपरेच्या मुळांशी जोडतो आणि आधुनिक जीवनशैलीतही माणुसकीचे आणि एकोप्याचे महत्त्व अधोरेखित करतो. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, हा सण आपल्याला गोड आठवणी देत सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देतो.
तारा न्यूज कडून तमाम कोल्हापूर वासियांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
संक्रांतीचा उत्सव: परंपरेचा गोडवा आणि उत्साहाचा संगम
|