शैक्षणिक
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची न्यू पॅलेस येथे क्षेत्र भेट
By nisha patil - 11/2/2025 3:23:58 PM
Share This News:
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची न्यू पॅलेस येथे क्षेत्र भेट
कोल्हापूर दि. 11 : विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11 वी कला शाखेच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी इतिहास विषयाच्या क्षेत्र भेट उपक्रमा अंतर्गत येथील न्यू पॅलेस, कोल्हापूर येथे भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी पॅलेसमधील ऐतिहासिक शस्त्रात्रे, दस्ताऐवज, शिकार केलेले प्राणी, प्राण्यांच्या कातडी , हत्यारे, तैलरंगातील चित्रे, विविध नकाशे, राज घराण्याच्या वंशावळी, समकालीन भांडी व वस्त्रे, राजांचा दरबार, हस्तीदंताच्या वस्तू, विविध मूर्त्या, मौल्यवान लाकडांपासून तयार केलेल्या वस्तू इत्यादीची माहिती घेतली.
या औद्योगिक क्षेत्र भेटीचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्रा.सौ. शिल्पा भोसले, प्रा.विश्वंभर कुलकर्णी , रजिस्ट्रार श्री आर बी जोग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सौ एस.एन.पाटील, प्रा.सौ एस पी वेदांते व प्रा.यु.एच. तिजाईकर, प्रा. ए. आर. धस यांनी केले होते. याप्रसंगी इयत्ता 11 वी कला शाखेच्या तिन्ही तुकडीतील विद्यार्थी , विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची न्यू पॅलेस येथे क्षेत्र भेट
|