बातम्या

मटका घेणाऱ्या गवळी बंधुंवर गुन्हा दाखल करा - शिंदे कुटुंबीयांची मागणी.

File a case against Gawli brothers who take matka


By nisha patil - 7/20/2024 4:11:01 PM
Share This News:



गेल्या महिन्यात गोकुळ शिरगाव येथील रवींद्र शिंदे यांनी गोकुळ शिरगावमधीलच एका लॉजमध्ये आत्महत्या केली होती. ही आत्महत्या मटक्याच्या व सावकारी व्याजाच्या उधारीतून झाली असल्याचा आरोप रवींद्र शिंदे यांच्या कुटुंबीयांनी केलाय.दरम्यान पतीच्या म्युत्युस कारणीभूत असणाऱ्या व मटका घेणाऱ्या गवळी कुटुंबीयांवर कारवाई व्हावी.अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि रवींद्र शिंदे यांच्या पत्नी हेमा शिंदे यांनी निवेदनाद्वारे केलीय.आज याबाबतचे निवेदन गोकुळ शिरगाव पोलिसांना देण्यात आलय.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामकृष्ण गवळी, प्रवीण गवळी ,निलेश गवळी, यांचे कोल्हापूर महापालिका परिसरात चहाचे दुकान आहे त्याच परिसरात ते मटका घेतात. रवींद्र शिंदे आणि गवळी कुटुंब यांची ओळख होती. शिंदे हे त्यांच्याकडे मटका घेण्यासाठी जात होते. त्यातून गवळी बंधूंकडे त्यांची उधारी झाली. या उधारी पोटी त्यांनी रवींद्र शिंदे यांचे कडून वारंवार पैसे उकळले, त्यांची एक्सेस मोपेड गाडी काढून घेतली होती.तसेच त्यांचा मानसिक छळ देखील सुरू होता. याच कारणास्तव रविंद्र शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नी हेमा शिंदे यांनी केलाय.

 त्यामुळ पतीच्या मृत्यूला गवळी कुटुंबीय जबाबदार असून  त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आलीय.


मटका घेणाऱ्या गवळी बंधुंवर गुन्हा दाखल करा - शिंदे कुटुंबीयांची मागणी.