बातम्या
महापालिका आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा - राहूल चिकोडे यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी
By nisha patil - 6/3/2024 9:49:09 PM
Share This News:
कोल्हापूर - कोल्हापूर येथील तरुणी सृष्टी शिंदे (वय 21) हिचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे दुर्दैवी अंत झाला. यासंदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी गेले असता आयुक्त उपस्थित नसल्याचे वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. त्यामुळे सर्वप्रथम मनपा अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपनाचा निषेध करण्यात आला. यावेळी तीव्र घोषणा देण्यात आल्या.
भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील भटक्या कुत्र्यांच्या विषयी अर्ज, निवेदणे, विविध मोर्चे, विनंती, सूचना महानगरपालिकेला दिल्या होत्या. तरीसुद्धा मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने व महानगरपालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे सृष्टी शिंदे या निष्पाप तरुणीचा दुर्दैवी अंत झाला. याला जबाबदार महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आहे.
या संदर्भात आज दिनांक 6 मार्च रोजी राहुल चिकोडे यांनी कोल्हापूर पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन महानगरपालिकेचे आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे सृष्टी शिंदे या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा असे निवेदन दिले.
तसेच काल महापालिका आयुक्त महापालिकेत उपस्थित नसल्याने त्यांना निवेदन देता आले नाही. ते आज इमेल द्वारे देताना त्यात आरोग्य अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्यानेच कोल्हापूरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण योग्य प्रमाणात केले जात नसल्यामुळे हा मृत्यू झाला आहे तरी सध्याचे आरोग्य अधिकारीअत्यंत निष्काळजी व बेजबाबदार असल्याने त्यांच्यावर त्वरीत निलंबनाची कारवाई झाली नाही तर अधिकारी सोकावतील व अशा पद्धतीचे वर्तन वारंवार होईल. पुन्हा एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी आम्ही कोल्हापूरात जाऊ देणार नाही असा ईशारा राहूल चिकोडे यांनी दिला.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना निवेदन देताना गायत्री राऊत, विशाल शिराळकर, प्रकाश सरनाईक, विवेक कुलकर्णी, अतुल चव्हाण,ओंकार खराडे, डॉ. श्वेता गायकवाड,माधुरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा - राहूल चिकोडे यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी
|