बातम्या

संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : अतुल लोंढे

File sedition case against Sambhaji Bhide Atul Londhe


By nisha patil - 6/28/2023 1:46:23 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :  मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही, असे विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा तो कसा दाखल करायचा ते काँग्रेस बघून घेईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.त्यांनी संविधान नीट वाचावे म्हणजे त्यांना कळेल की १५ ऑगस्टला भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नाही तर सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्वातंत्र्याची ती नांदी होती. जे स्वातंत्र्य मनुस्मृतीने या देशातील बहुजन समाजाला पाच हजार वर्षांपासून नाकारले होते. भाजप व संघ विचाराच्या लोकांना अखंड भारतावर तर बोलण्याचा अधिकारच नाही, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.


संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : अतुल लोंढे