बातम्या

संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : भीम पप्रतिष्ठान कागल

File sedition case against Sambhaji Bhide Bhima Papratisthan Kagal


By nisha patil - 6/30/2023 12:30:19 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही, असे विधान करुन तमाम भारतीयांचा आणि स्वातंत्र्य निवडून देणाऱ्या सैनिकांचाही अपमान केला. कोरोना काळात मयत झालेल्या लोकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान केला. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक अशी मागणी भीम प्रतिष्ठान कागल अध्यक्ष सुरज कुमार कामत  यांच्या वतीने करण्यात आली. भीम प्रतिष्ठान कागल अध्यक्ष सुरज कुमार कामत यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे निवेदन कागल पोलिसांना देण्यात आल.यावेळी सुरज कुमार कामत, रवी कांबळे,सचिन डफळे,गणेश कांबळे,रोहित मोरे उपस्थित होते


संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : भीम पप्रतिष्ठान कागल