विशेष बातम्या
अखेर बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील
By nisha patil -
Share This News:
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत प्रेमिंमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालात राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. विधीमंडळ कायद्याने केलेल्या कायद्यात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. हा कायदा प्राण्यांचा छळ करणारा नाही असे निरिक्षण कोर्टाने नोंदवले आहे. त्यामूळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेत सर्व बाजु न्यायालयाने ऐकून घेतल्या.दरम्यान महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीसोबतच तमिळनाडूतील जल्लिकट्टू या प्रसिद्ध खेळाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने आमच्यासाठी एक उत्सवच असून आम्हाला खूप आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली
अखेर बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील
|