अखेर कॉलगर्लचा नाद त्याला जीवावर बेतला

Finally, the call girl's voice saved him


By surekha - 12/7/2023 4:46:51 PM
Share This News:



अखेर कॉलगर्लचा नाद त्याला जीवावर बेतला

 पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या भिवंडीतील 42 वर्षीय व्यक्तीला कॉलगर्लचा  नाद जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलगर्लवर पैशांची उधळपट्टी पाहून दोन कॉलगर्ल्सनी त्यांच्या बॉयफ्रेण्डशी संगणमत करुन या व्यक्तीच्या घरातील रोकड चोरण्याच्या उद्देशाने त्याची धारदार चाकूने गळा चिरुन निर्घृण हत्या केली. ही घटना कल्याण-पडघा मार्गावरील बापगांव गावातील मल्हारनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी दोन कॉलगर्ल्ससह एक साथीदाराला अटक केली आहे. मात्र गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.शिवाणी धर्मा जगताप आणि भारती गोविद कोमरे अशी अटक केलेल्या कॉलगर्ल्सची नावे असून संदीप माणिक पाटील असे अटक केलेल्या कॉलगर्लच्या बॉयफ्रेण्डचे नाव आहे. हे तिघेही उल्हासनगरमधील माणेरे गावात राहणारे आहेत. देवा रॉय  असे फरार आरोपीचे नाव आहे. तर दीपक सीताराम कुऱ्हाडे असे निर्घृण हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मृत दीपक हा गेल्या चार वर्षापासून बापगावमधील मल्हार नगरमधील परिसरात पत्नीपासून विभक्त राहत होता. तो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी असून इंटीरियरचे कामे घेण्याचा ठेकेदार असून मोठ्या रुबाबात राहत होता. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून त्याची ओळख आरोपी कॉलगर्ल शिवानीसोबत झाली होती. स्वतःची  शारीरिक भूक भागवण्यासाठी तो तिला कॉल करुन घरी बोलवत होता. त्यावेळी तो तिच्यावर पैशांची उधळपट्टी करुन मद्यधुंद अवस्थेत शारीरिक भूक भागवत होता. तर कधी कधी दोन कॉलगर्ल्सना घरी बोलावून दोघींशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्यातच मध्यतंरी आरोपी शिवानीने दीपकच्या घरी येणे बंद केलं होत.29 जून 2023 रोजी दीपकने कॉलगर्ल शिवानीला कॉल करुन शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरुन तिने बॉयफ्रेण्ड संदीप, तिची मैत्रीण कॉलगर्ल भारती आणि तिचा बॉयफ्रेड देवा यांच्याशी संगनमत मृताच्या घरातील ऐवज आणि रोकड लुटण्याचा कट रचला होता.

त्यानंतर मृत दीपकने आरोपी शिवानीला कॉल केला. तेव्हा 30 जून 2023 रोजी दोघी आरोपी कॉलगर्ल रात्रीच्या सुमारास दीपकच्या घरी रिक्षाने आल्या होत्या. त्या रात्री दोघींनीही दीपकसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत त्याला भरपूर दारु पाजली. त्यानंतर दोन्ही बॉयफ्रेण्ड हे अॅक्टिव्हा दुचाकीवरून दीपकच्या घरी पोहोचले असता, या चौघांनी मिळून दीपकच्या डोक्यात दारुची बाटली फोडून त्याचा धारदार चाकूने गळा चिरला. जाताना दीपकच्या घराच्या दाराला बाहेरुन कडी लावून एकाच अॅक्टिव्हावरुन चौघे फरार झाले होते.दरम्यान दीपकच्या आईने त्याच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आईने कल्याणमध्ये राहणाऱ्या त्याच्या घटस्फोटित पत्नीला कॉल करुन दीपकच्या घरी काही तरी घडले असून बघून ये असे सांगितले. त्यानंतर दीपकची 16 वर्षीय मुलगी बापगावला आली. वडील राहत असलेल्या घराला बाहेरुन कडी लावलेली तिला दिसली. तिने कडी उघडल्यावर घरात वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पडघा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना करुन अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साबळे, सपोनि नितीन मुद्गुल  आणि ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस सुरेश मनोरे यांच्या पथकाने सुरु केला. यावेळी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि मृताच्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक तपास करुन मोबाईल लोकेशनवरुन आरोपी शिवानीला  उल्हासनगरमधील माणेरे गावातून ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, तिने आरोपी संदीप, देवा  आणि भारती असे चौघांनी मिळून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.दीपक कुऱ्हाडे हा ठेकेदार असून परिसरात अतिशय रुबाबात राहायचा. भावाने सांगितल्याप्रमाणे दीपक अंगावर सोन्याचे दागिने घालत होता आणि अतिशय थाटामाटात तसंच श्रीमंतासारखा आयुष्य जगत होता. तर दुसरीकडे दीपक कुऱ्हाडेला कॉलगर्लचा नाद होता आणि तोच त्याच्या जीवावर बेतला. कॉलगर्लने दिलेल्या कबुलीनुसार मयत हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसे उडवत होता. गळ्यामध्ये सोन्याची चैन, हातात सोन्याची अंगठी असं श्रीमंतांसारखे जीवन जगत होता. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असतील या हेतूने या कॉलगर्लने दीपकचा काटा काढून त्याच्या घरात असलेली संपत्ती लुटायचा प्लॅन आखला. मैत्रीण आणि बॉयफ्रेण्डसोबत मिळून कॉलगर्लने दीपकची गळा चिरुन हत्या केली आणि तिथून पसार झाले. पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून आरोपी शिवानी धर्मा जगताप  ,भारती गोविद कोमरे , बॉयफ्रेण्ड संदीप यांना अटक केली. तर आरोपी देवा अद्यापही फरार आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 30 हजार रुपये रोख, चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.


अखेर कॉलगर्लचा नाद त्याला जीवावर बेतला