बातम्या
अखेर ए. एस ट्रेडर्सचा मुख्यसूत्रदार लोहितसिंग सुभेदार जेरबंद
By nisha patil - 9/20/2023 7:45:18 PM
Share This News:
कमी कालावधीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोण गुंतवणूक करून घेतलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम ए . एस. ट्रेडर्स . कंपनीने गुतंवणूकदारांना परत केली नाही. ऑक्टोंबर 2022 पासून परतावे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली होती . नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यात ए एस ट्रेडर कंपनीसह २७ संचालक आणि एजंट वर गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हापासून कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार अटक टाळण्यासाठी धावपळ करत होता. सुभेदाराने मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात ही अटकीपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर स्वतःहून पोलिसात हजर होणार असल्याची माहिती ऑनलाईन मीटिंग द्वारे गुंतवणूकदारांना दिली होती. मात्र त्यानंतरही तो पोलिसांना गेले कित्येक दिवस चकमा देत होता.
याच दरम्यान गणपतीचे दर्शनासाठी लोहित सिंग सुभेदार मंगळवारी कोल्हापूर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार मंगळवारी सकाळी महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून लोहितसिंगला अटक केली., याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली
अखेर ए. एस ट्रेडर्सचा मुख्यसूत्रदार लोहितसिंग सुभेदार जेरबंद
|