बातम्या
सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर 'राजेच ' उमेदवार
By nisha patil - 4/17/2024 12:53:27 PM
Share This News:
दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली. सातारा लोकसभा मतदारसंघातील वातावरण सध्या तापले असून उदयनराजे छत्रपती यांच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांना लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी निदर्शने केली होती. साताऱ्याची जागा भाजपकडे जाणार की राष्ट्रवादीकडे हा तिढा काही सुटत नव्हता. लोकसभा निवडणुकीमध्ये ही जागा भाजप शिवसेना आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने लढविली होती. या निवडणुकीमध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला होता. ही निवडणूक भर पावसामध्ये शरद पवार यांनी केलेल्या भाषणामुळे गाजली होती. शरद पवार यांच्या भाषणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनमत ढवळून निघाले होते. 2024 साठी ही जागा कोण लढवणार हा तिढा कायम होता. छत्रपती उदयनराजे यांना ही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती त्यानुसार त्यांनी डावपेच ठेवण्यास सुरुवात केली होती. दिल्लीमध्ये जाऊन उदयनराजे छत्रपती यांनी अमित शहा यांची भेट घेतली व तिथे तळ ठोकला होता. दिल्लीमध्ये उदयनराजे व देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याच्या बातम्या आहेत. अखेरीस बऱ्याच प्रतीक्षेनंतर भाजपच्या बाराव्या यादीमध्ये उदयनराजे यांचे नाव सातारा लोकसभा मतदार संघासाठी लोकसभेचा उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले.
सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर 'राजेच ' उमेदवार
|